① ७२ ② ६३
③
६४ ④
७४
२) एक खुर्ची बनविण्यास अ ला ६ तास, ब ला
७ तास आणि क ला ८ तास लागतात. जर त्या तिघांनी दररोज ८ तास या प्रमाणे २१ दिवस काम
केले तर किती खुर्च्या तयार होतील ?
① ६१ ② ६७
③ ७३ ④ ७९
३)
एक माणूस एका गावाला जाण्यासाठी ३ km प्रतितास वेगाने
गेला तर ४० मिनिटे उशिरा पोहचतो आणि ४ km प्रतितास वेगाने गेला तर ३० मिनिटे लवकर
पोहोचतो तर त्या दोन ठिकाणामधील अंतर किती ?
① १६ km ② १४ km
③ १२ km ④ १० km
४) मुलांच्या रांगेत तुषारचा एका टोकाकडून २५ वा आणि
दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती ?
① ५० ② ५२ ③ ४९ ④ ५१
५)
प्रत्येकी ५ पेढे दिले तर काही पेढे २४ मुलांना
पुरतात. तेच पेढे प्रत्येक मुलास ३ दिले तर किती मुलांना पुरतील ?
① ६२ ② ८२ ③ ४० ④ ६४
६)
वस्तू ठराविक किमतीला विकल्याने ४%तोटा होतो, जर तिची
किंमत ५५०रु.ने वाढवली तर ६%नफा होतो तर त्यावस्तूची मूळ किंमत किती ?
① ६०००
② २७५०० ③ ७७५० ④ ५५००
७)
तीन नळ अ, ब, क एका टाकीला ६० मि. भरतात. १० मि.
तीनही नळ चालू ठेवले आणि नंतर क नळ बंद केला तर शिल्लक टाकी अ आणि ब दोघांनी ८०
मिनिटात भरली तर फक्त क एक पूर्ण टाकी
किती मिनिटात भरेल ?
① १२०
② २ ③ १६० ④ १/४
८)
एक सायकल दुकानदार एका सायकलवर ४ % सुट देतो, एक
सायकल विकल्यावर दुकानदाराला १५३६ रु. रोख मिळाले तर त्या सायकलीची दर्शनी किंमत
किती ?
① १४८० ② १६०० ③ १४००
④ १६८०
९)
५०००० रु. वर पहिल्यावर्षी १० % , दुसऱ्यावर्षी २०
% , तिसऱ्यावर्षी ३० % चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती ?
① ६८००० ② ६५००० ③ ७८००० ④ ८५८००
१०)
दोन
संख्यांचा मसावी हा लसावी च्या १/५ पट आहे. जर मसावी १५ आणि एक संख्या ४५ असेल तर
दुसरी संख्या कोणती ?
① २५ ② ६५ ③ ७५ ④ १००
११)
११ पासून
४० पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?
① ७८० ② ६२० ③ ७६५ ④ ५४०
१२)
३ , ४ , ५
या अंकांची अदलाबदल करून पुनरावृत्ती न होऊ देता जेवढ्या संख्या तयार होतील त्या
सर्व संख्यांची बेरीज किती ?
① १९९८ ② २६६४ ③ २६३४ ④ २६८४
१३)
४० ही संख्या रोमन पद्धतीत कशी लिहितात ?
① LX ② XXXX ③ XL ④ XC
१४)
अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला १५ ने भाग
दिल्यास बाकी ५ उरते, २१ ने भाग दिल्यास बाकी ११ उरते, आणि २८ ने भाग दिल्यास बाकी
१८ उरते तर ती संख्या कोणती ?
① २०० ② ४१०
③ ८३० ④ २१०
१५)
एका
संख्येच्या २/३ मध्ये २८ मिळवल्यास त्या संख्येतून ४८ वजा करून येणारी संख्या
मिळते तर ती संख्या कोणती ?
① २२५ ② २२८ ③ २३० ④ यापैकी नाही.
१६)
९, १४,
१९, २४, २९, ............या संख्या मालेतील पहिल्या ८०संख्यांची सरासरी किती ?
① २०२ ② २०४ ③ २०६.५ ④२००
१७)
दोन
संख्यांचा गुणाकार ३६० आहे प्रत्येक संख्येची ३ पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय
येईल?
① १४४० ② ७२० ③ १०८० ④ २८८०
१८)
४२ मी.
लांबीची पट्टी ६ ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मी. लांबीचा
असेल?
① ८ मी. ② ९ मी. ③ ७ मी. ④ ६ मी.
१९)
एका
दुकानात तीन पाते असणारे जेवढे पंखे आहेत तेवढेच पंखे चार पाते असणारे आहेत तर
सर्व पंख्यांची एकूण पाते ११९ असल्यास दोन्ही प्रकारचे पंखे किती ?
① ३४ ② १९ ③ १७ ④२८
२०)
१२ + १२ ÷ ३ × ८ – ५ = ?
① ५९
② २४ ③ ३९ ④ ४०
२१)
दगडूबाने
आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला, उरलेल्या २५
एकरात ऊस ज्वारी आणि मोसंबी लावली ते त्यांच्याकडे एकूण शेती किती ?
① ५०
② ६० ③ १२० ④७५
२२)
७/३, ११/१०,
१५/१४, ६/५ आणि ४/३ या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास कोणती परिमेय संख्या
शेवटून दुसरी येईल ?
① ७/६ ②६/५ ③१५/१४, ④११/१०,
२३)
एकक
स्थानी ४ किंवा ५ हे अंक असणाऱ्या तीन अंकी एकूण पुर्णवर्ग संख्या किती ?
① ७
② ६ ③ ९ ④८
२४)
एक वस्तू
५६०रु. विकल्यास एका दुकानदारास १२.५% तोटा होतो, ती वस्तू कितीला विकावी म्हणजे
१२.५% नफा होईल ?
① ६४० रु.
② ६३० रु. ③ ७०० रु. ④ ७२० रु.
२५)
जॉनने
२५०० रु. मोतीलाल ला २ वर्षे मुदतीसाठी, ४००० रु. पोपटलाल ला ३ वर्षे मुदतीसाठी
व्याजाने दिले त्याला दोघांकडून एकूण १२७५ रु. सरळव्याज मिळाले तर व्याजाचा दर काय
होता ?
① ८.५ %
② ७ % ③ ८% ④७.५ %
२६)
१.५ किमी
+ ५० मी. + ५० सेमी = .................किमी
① १.५५५ ② १.५५०५ ③ १.५५००५
④१.५०५०५
२७)
सुरेश
महेशपेक्षा ३ दिवसांनी मोठा आहे. रमेश महेश पेक्षा ८ दिवसांनी लहान आहे.
प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो, तर सुरेशचा जन्मदिवस कोणता ?
①५ फेब्रुवारी ② १४ जानेवारी
③ ३० जानेवारी ④१५ जानेवारी
२८)
सव्वा सात
वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात कोणता कोण तयार होतो ?
①१२७.५ ̊ ②१३७.५ ̊
③ १२० ̊ ④१२५.५ ̊
२९)
प्रदीप,
अशोक, सुधीर आणि दीपक कॅरम खेळत आहे. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू आहे.
सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपक चे तोंड` पूर्वेला असेल तर उत्तर दिशेला
कोणाचे तोंड असेल ?
① सुधीर ② प्रदीप ③ अशोक ④ दीपक
३०)
एका
काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी ४५ सेमी असून, त्याच्या एका बाजूची लांबी 27
सेमी आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती ?
① २४ सेमी ② २९ सेमी ③ २५ सेमी
④३६ सेमी
३१)
एका
वर्तुळाचा परीघ ११० सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
① ३५ सेमी ② २८ सेमी ③ १४ सेमी ④ १७.५ सेमी
३२)
एका आयताचा कर्ण २५ सेमी असून त्याची रुंदी ७
सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
① ६४ सेमी
②६२ सेमी ③ ९६ सेमी
④ ८२ सेमी
३३)
३ मी
लांबी, २ मी. रुंदी व ०.५ मी उंची असलेली टाकी भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल ?
① ३००० ली.
②२००० ली. ③ २०० ली.
④ ३०० ली.
३४)
अनिलला
त्याचे व त्याच्या बहिणीचे वय विचारले असता तो म्हणाला, “तीन वर्षापूर्वी मी
बहिणीच्या ८ पट मोठा होतो, दोन वर्षापूर्वी चारपट मोठा होतो, गतवर्षी तीनपट मोठा
होतो आणि या वर्षी बहिणीच्या अडीच पट मोठा आहे.” या वरून बहिणीचे आजचे वय किती
असेल ?
① ४.५
② ८.५ ③ ३.८ ④ ७ (प्रश्न रद्द करण्यात आला आहे)
३५)
एक पोलिस
आणि चोर यांच्यामध्ये ४०० मी. अंतर आहे. पोलिसाला पाहून चोराने पळायला सुरुवात
केली. तो ११ km/hr धावतो तर त्याच्या मागे पोलीस १० km/hr याप्रमाणे धावत असेल तर
१२ मिनिटानंतर दोघातील अंतर किती ?
① ५०० मी.
②६०० मी.
③ ३०० मी. ④
२०० मी.
३६)
जर NAME =
१६.५ तर TAME = ?
①१८.५
②१९.५
③ २०.५ ④ २१.५
३७)
स्टील, पितळ,
तांबे यांच्याशी साम्य असणारा शब्द कोणता ?
①कॅल्साइट
②मॅग्नालीयम
③ मिथेन ④ जस्त
३८)
२, ९, ३८,
१५५, ?
① ३१४
②१९३ ③ ६२३ ④ ६२४
३९)
एका स्टेजवर
३२ व्यक्ती एकत्र आले त्यांनी प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती
हस्तांदोलन होतील ?
① ४९६ ②४५० ③ ५९६ ④ ४००
४०)
HINDU या
शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता
येतील ?
① १९६
②१२०
③ १०० ④ ४८०
४१)
जर + म्हणजे - , - म्हणजे ×, × म्हणजे ÷ आणि ÷ म्हणजे +, तर ३२+८ ×२-३÷ ४ = ?
① २०
②२२ ③ २५ ④ २४
४२)
एका
सांकेतिक भाषेत ८८८ = ४५६ तर ९९९ = ?
① ७६५
②५६७
③ ५५५ ④ ६६६
४३)
एका
पिंजऱ्यात १२ सोडून सर्व बदक, ११ सोडून सर्व मोर, १७ सोडून सर्व पोपट आहेत. त्या
पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असलीत तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत ?
① ३४
②२५ ③ ४० ④ २०
४४)
बाजूच्या
आकृतीत एकूण चौकोन किती ?
① २१ ②४० ③ २० ④ ५०
४५)
५ तास ४०
मिनिटांच्या ३०% म्हणजे किती वेळ ?
① १ तास २ मि.
②१ तास ४२ मि.
③ १ तास ६ मि. ④ २ तास ४२ मि.
४६)
मल्याळम
या भाषेला खालीलपैकी कोणत्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त
झाला आहे ?
① २०१४ ② २००८ ③ २०१३ ④ २००५
४७)
मराठी
वर्णमालेत एकूण किती ईषतपृष्ठ वर्ण आहेत ?
①चार ② दोन
③तीन ④यापैकी नाही
४८)
विजातीय
स्वरांच्या एकूण किती जोड्या आहेत ?
①६४ ②६८ ③६० ④६२
४९)
रावण या
संधीयुक्त शब्दाची फोड खालीलपैकी कोणती ?
①रौ+अन ② रौ+अण ③ रो+अन ④रो+अण
५०)
धनदौलत ?
①मराठी+मराठी ②फारशी+फारशी ③ फारशी+मराठी ④मराठी+फारशी
५१)
राणी
राजुपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
उपपदार्थ ओळखा ?
① प्रमाण ②परिणाम ③ न्यूनत्व ④तुलना
५२)
तिच्यातील
आई जागी झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा ?(वाक्यातील उपयोगावरून )
① विशेषनाम ②सामान्यनाम ③ भाववाचक नाम ④धातुसाधित नाम
५३)
खालीलपैकी
सर्वलिंगी सर्वनाम ओळखा ?
① मी ②तू ③जो ④तो
५४)
वरचा मजला अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा ?
①विकारी विशेषण ②अव्ययसाधित
विशेषण ③ संख्या विशेषण ④वरील सर्व
५५)
अर्जुन-श्रीकृष्णास म्हणतो .
①संनिहित भूतकाळ ②संनिहीत भविष्यकाळ ③ऐतिहासिक वर्तमान काळ ④स्थिर सत्यदर्शक वर्तमानकाळ
५६)
शामरावांनी मुलाला शाळेत घातला .
①कर्तु-कर्म संकर प्रयोग ② कर्तु-भाव संकर प्रयोग ③कर्म-भाव संकर प्रयोग ④कर्तु-कर्म-भाव संकर प्रयोग
५७)
गंगायां
घोष .
①लक्षणामुलक शाब्दी व्यंजना ②अभिधामुलक
शाब्दी व्यंजना ③आर्थी व्यंजना ④शुद्धा लक्षणा
५८)
खालीलपैकी
कोणत्या समासात पहिले पद हे संस्कृतातील सप्तमीत असते ?
①उपपद तत्पुरुष समास ②नत्र् तत्पुरुष समास ③ अलुक तत्पुरुष समास ④विभक्ती तत्पुरुष समास
५९)
अंमलबजावणी
=?
① मराठी+मराठी ②मराठी+फारशी ③फारशी +मराठी ④फारशी+फारशी
६०)
गरुड ध्वज
①
सिद्ध शब्द ②साधित शब्द ③
सामासिक शब्द ④अभ्यस्त शब्द
६१)
खालीलपैकी
परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा ?
① समोर ② भर ③ केवळ ④मात्र
६२)
ती काय माती
गाते.
① क्रियाविशेषण अव्यय ② साधित नाम ③सिद्ध नाम ④विशेषण साधित नाम
६३)
तो चोर
गाडी भरधाव घेऊन पळाला ?
① संयुक्त क्रियापद ②अकर्मक क्रियापद ③सिद्ध क्रियापद ④साधित क्रियापद
६४)
आपण तिला
मदत करायला पाहिजे.
①कर्तव्यसुचक ②प्रारंभ सूचक ③समापन सूचक ④परवानगी सूचक
६५)
हसताना
त्याचे दात दिसतात .संबंधित वाक्यात अधोरेखित केलेले कृदंत कशाचे कार्य करते
?
①नाम ②विशेषण ③ क्रियाविशेषण अव्यय ④ वरील सर्व
६६)
कर्तरी
प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर ते खालीलपैकी कोणत्या विभक्तीत असते ?
①प्रथमा,तृतीया ②
प्रथमा,द्वितीया ③ प्रथमा,चतुर्थी ④प्रथमा,षष्ठी
६७)
येताना मुलांना घेऊन या .
①भावे प्रयोग ②कर्मणी प्रयोग ③ मिश्र
प्रयोग ④यापैकी नाही
६८)
मग येईजे
अतिसमीप विवाही |
①कर्तरी प्रयोग ② कर्मणी प्रयोग ③ भावे प्रयोग ④मिश्र प्रयोग
६९)
तो
साक्षात बलसेवनच करीत आहे .
①शुद्धा साध्यवासना लक्षणा ②शुद्धा सारोपा लक्षणा ③शुद्धा उपादान लक्षणा ④शुद्धा लक्षणा-लक्षणा
७०)
अहिनकुल
या सामासिक शब्दाचा समास ओळखा ?
①अव्ययीभाव समास ②तत्पुरुष समास ③ द्वंद्व समास ④बहुव्रीही समास
७१)
महाराष्ट्र
क्रीडा ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे ?
①मुंबई ② पुणे ③ नागपुर ④ नाशिक
७२)
सध्या चर्चेत असलेली ज्ञानवापी मस्जिद कोणत्या
ठिकाणी स्थित आहे ?
①आयोध्या ②प्रयागराज ③वाराणसी ④लखनऊ
७३)
आंतरराष्ट्रीय
नाणेनिधी चे मुख्यालय कोठे आहे ?
① जकार्ता ②वाशिंग्टन ③जिनिव्हा ④पॅरीस
७४)
मुंबईचा
गवळीवाडा कोणास म्हटले जाते ?
①सिंधुदुर्ग ②पालघर ③ रत्नागिरी ④नाशिक
७५)
२० च्या
नोटेवर कोणते चित्र आहे .
① सांची स्तूप ②राणीची बाग ③वेरुळच्या गुफा ④हम्पीचा रथ
७६)
लाल
क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
①
मेंढीपालन ② अंडी उत्पादन ③खनिज तेल ④कोळंबी उत्पादन
७७)
भारतीय
स्वातंत्र्याचा कायदा खालीलपैकी कोणत्या
वर्षी पारीत करण्यात आला ?
①१९३५ ②१९४७ ③१८९९ ④१८३५
७८)
पाणी
पंचायतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
①एस.आर.रंगनाथन ②विनोबा भावे ③
विलासराव साळुंखे ④वसंतराव नाईक
७९)
गोंड
राजाचा जिल्हा कोणता ?
①गडचिरोली ②चंद्रपूर ③नंदुरबार ④गोंदिया
८०)
रुपत्या
घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो ?
① महाबळेश्वर –अलिबाग ② पोलादपूर –वाई ③ संगमेश्वर-कोल्हापूर ④पुणे-महाड
८१)
कृष्णा नागर हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी
संबंधित आहे ?
①भालाफेक ②नेमबाजी ③उंच उडी ④यापैकी नाही
८२)
......हे
आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते .
①सीता स्वयंवर ② रामराज्यवियोग ③माधवराव पेशवा ④गोपीचंद
८३)
समाज
सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे ......होते .
①श्रीमंत अप्पासाहेब ②चौथे शिवाजी महाराज ③राजर्षी शाहू महाराज ④श्रीमंत जयसिंग राव
८४)
मराठीतील सगळ्यात
पहिली कादंबरी कोणती ?
① मुक्तामाला ②वळीबा पाटील ③
यमुना पर्यटन ④मोचनगड
८५)
वास्को-द-गामा
हा.....या देशाचा दर्यावर्दी होता.
① पोलंड ②इंग्लंड ③फ्रान्स ④पोर्तुगाल
८६)
एक गाव एक
पाणवठा ही चळवळ कोणी सुरु केली ?
①बाबा आढव ② बाबा आमटे ③साधना आमटे ④ डॉ.प्रकाश आमटे
८७)
उडीद या पिकाचे मूळ उत्पत्ती स्थान पुढीलपैकी
कोणते ?
①इराण ②भारत ③ चीन ④श्रीलंका
८८)
गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते ?
①रुद्रप्रयाग ②ऋषिकेश ③गढवाल ④अलाहाबाद
८९)
खालीलपैकी
कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते ?
①संघ लोकसेवा आयोग ② भारताचे राष्ट्रपती ③ भारतीय संसद ④मानव संसाधन मंत्रालय
९०)
.......ही
भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे .
①हिस्सार ② चंद्र ③गंगा ④सियाचीन
९१)
.......हा
जागतिक मृदा दिन होय ?
① ३ जानेवारी ② ७ मे ③४ ऑक्टोबर ④५ डिसेंबर
९२)
महाराष्ट्र
राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली ?
① १९८२ ②१९५२
③१९७२ ④१९६२
९३)
खालीलपैकी
पर्यावरणपूरक ई-कार उपक्रम राबवणारे
भारतातील पहिले राज्य कोणते ?
①आंध्रप्रदेश ②महाराष्ट्र ③कर्नाटक ④केरळ
९४)
भारतीय
रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले ?
①१९४८ ②१९५२ ③१९५० ④१९५७
९५)
खालीलपैकी
भारतात एकूण उच्च न्यायालये किती आहेत ?
①२१ ②२३ ③२५ ④२७
९६)
पेपेन हे
औषधी द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते ?
①कागदी लिंबू ②पपई ③पेरू ④लिची
९७)
......च्या
अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो .
①क्षार पदार्थ ②ह्युमस ③भूजल पातळी ④यापैकी नाही
९८)
खालीलपैकी कोणता हरितगृह वायु नाही ?
①कार्बन डायऑक्साइड ②क्लोरोफ्लुरो कार्बन ③हायड्रोजन ④वरील पैकी नाही
९९)
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार
होते,त्या कणांना .....असे म्हणतात .
①इलेक्ट्रॉन ②पॉझिट्रॉन ③फोटॉन ④प्रोटॉन
१००) ...... हा अविरक्त किरणांचा स्त्रोत आहे .
①मिट्टी तेल ②विद्युत बल्ब ③जर्नस्ट ग्लोवर ④प्रतिदिप्त नलिका