बार्टीमार्फत ‘संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी २०२१’ साठी पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण
⚡ बार्टी संस्थेने यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षा 2020 च्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीकरिता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले होते.
🧐 संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी पात्र उमेदवारांना बार्टी संस्थे मार्फत आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
👥 या उपक्रमामध्ये सहभागी 23 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांना यु.पी.एस.सी. परीक्षेत यश प्राप्त झाले होते.
👉 गतवर्षीप्रमाणे व उमेदवारांच्या मागणीनुसार यावर्षीही सनदी अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक यांचेद्वारे व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
💰 आर्थिक सहाय्य मिळणार : बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- चे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🖥️ सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे.