
ऑलिम्पिकचा इतिहास : २६ जुलैपासून ऑलिम्पिक २०२४ ची (Paris Olympics 2024) सुरुवात होणार आहे. त्यासाठी प्रेक्षक आपल्या देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळचे उजमानपद पॅरिसकडे भूषवण्यात आले आहे. यंदाचे ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान खेळवले जाणार आहेत. ऑलिम्पिक ही जगामधील सर्वात मोठी आणि जुनी स्पर्धा आहे. प्रत्येक खेळाडूचे या स्पर्धेमध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न असते. परंतु ऑलिम्पिक या स्पर्धेला कधीपासून सुरुवात झाली? “ऑलिम्पिक” या शब्दाचा उगम कसा झाला या संदर्भात तुम्हाला माहिती आहे का? पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. या लेखामध्ये आज आपण ऑलिम्पिकचा इतिहास जाणून घेणार आहोत.
“ऑलिम्पिक” शब्दाचा उगम कसा झाला?
ऑलिम्पिक खेळ, ऑलिम्पिक स्पर्धा हे शब्द मागील १० वर्षांमध्ये खूप ऐकले असतील. परंतु ऑलिम्पिक हा शब्द कुठून आला? या स्पर्धेला ऑलिम्पिक असे का नाव ठेवण्यात आले? वास्तविक, ऑलिम्पिक खेळ सुमारे ३००० वर्षांपूर्वी सुरू झाले, जे ग्रीसच्या ऑलिंपियामध्ये खेळले जात होते. या ऑलिंपिया शहरातूनच या खेळांना ‘ऑलिम्पिक’ हे नाव पडले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेला कधी सुरुवात झाली?
ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात ३००० वर्षांपूर्वी झाली आहे. हे खेळ प्राचीन ग्रीसमध्ये खेळले जात होते. १९ व्या शतकाच्या शेवटी या खेळांचे पुनरुज्जीवन झाले आणि ते जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा बनले. ही सर्वात जुनी आणि मोठी स्पर्धा मनाली जाते, १८९४ मध्ये फ्रान्सच्या पियरे डी कौबर्टिनने या खेळांचे पुनरुज्जीवन केले. त्यानंतर १८९६ मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स येथे प्रथमच आधुनिक ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ऑलिम्पिक स्पर्धा अथेन्समधील पॅनाथेनाइक स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये त्या काळात फक्त १४ राष्ट्रे आणि २४१ खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी ४३ खेळांमध्ये सहभाग घेतला होता. १९०० मध्ये झालेल्या दुसऱ्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन पॅरिसने केले होते.
भारताचे पहिल्या ऑलिम्पिक मेडल
१९०० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक मेडल मिळाले होते. हे मेडल नॉर्मन प्रिचर्ड या एकमेव खेळाडूने भारतासाठी दोन रौप्यपदके जिंकली होती. १९२८ मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक भारताच्या हॉकी संघाने मिळवून दिले होते. त्यानंतर वैयक्तिक २००८ मध्ये पहिले सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा हे एकमेव खेळाडू होते.