निखत झरीनः जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला सुवर्णपदक
Type Here to Get Search Results !

निखत झरीनः जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला सुवर्णपदक

Top Post Ad

 भारताची बॉक्सिंगपटू निखत झरिनला सुवर्णपदक मिळाले आहे. तिने थायलंडच्या जितपॉंग जुतामासा हिला पराभूत केले. तिने 50 किलो वजनी गटात हे सुवर्णपदक मिळवले आहे.

हा किताब मिळवणारी ती मेरी कोम नंतरची दुसरी भारतीय महिला ठरली आहे.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

मुंबई : भारताच्या निखत झरीनने भारताचा तिरंगा उंचावत अभिमानास्पद गोष्ट केली आहे. जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत निखतचा सामना आता थायलंडच्या जितमास जितपाँगबरोबर झाला. 

निखतने या सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखले आणि तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.या सामन्याच्या सुरुवातीपासून निखत आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. निखतने यावेळी प्रतिस्पर्धी जितमासला गुण पटकावण्याची एकही संधी दिली नाही. आक्रमकपणे ही लढत खेळत निखतने भारतासाठी सुवर्णाची कमाई केली. निखतने अंतिम फेरीच्या सामन्यात जितमासचा ५-० असा धुव्वा उडवला. मेरी कोम, सरीता देवी, जेनी आर. एल. आणि लेखा के.सी. यांच्यानंतर हे सुवर्णपदक जिंकणारी निखत ही भारताची पाचवी महिला खेळाडू ठरली आहे. निखतने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदार कामगिरी केली होती. निखतने यावेळी ५२ किलो वजनी गटामध्ये ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडाचा ५-० असा पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे निखतने रौप्यपदक निश्चित केले होते. पण तिने यावेळी रौप्य पदकावर समाधान मानले नाही. अंतिम फेरीत मोठ्या जोशात निखत उतरली आणि तिने अव्वल कामगिरीचा उत्तम नमुना पेश केला. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव असतो, हे निखतने यावेळी दाखवून दिले. कारण या सामन्याच्या सुरुवातीपासून निखतने आक्रमणावर जोरदार भर दिला होता. त्याचबरोबर तिने चांगला बचावही केला आणि थआयलंडच्या जुतमासला एकही गुण पटकावू दिला नाही. निखतने या सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखले.


या दमदार विजयानंतर निखतने सांगितले की, " बॉक्सिंग हा महिलांचा खेळ नाही, असे मला सांगितले जायचे. पण ही समजूत चुकीची आहे हे मला दाखवून द्यायचे होते. यासाठी मी अथक मेहनत घेतली होती आणि ही मेहनत आज अखेर फळाला आली, असे मला वाटते. हा विजय माझ्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण मी देशासाठी पदक जिंकू शकले, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे."

Below Post Ad