📍 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, अन्न आणि औषध प्रशासन (गट ब) साठीचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. एमपीएसी आयोगान ट्विट करत अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने अमागास वर्गातील पाच रिक्त पदांवरील शिफारस केलेल्या उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. औषध निरीक्षक, अन्न आणि औषध प्रशासन (गट ब) साठीचा निकाल 21 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. निकालासंबंधित याचिकेनंतर औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशातनुसार, या जाहीरातील 35 पदांपैकी 30 पदांचा निकाल जाहीर करत पाच पदे रिक्त ठेवण्यात आली होती.
✒️ आयोगाने पूर्वीच्या निकालात बदल करत नवा निकाल जाहीर केला आहे. पाच पदांवर शिफारस करताना आयोगाने बदल केला आहे. यामध्ये सुधारित निकालानुसार, देशमुख प्रविण पझाकर, शिवाजी मारुती शिंदे, मंथन योगिराज तांदळे आणि ऋषिकेश शांताराम घुले हे चार उमेदवार शिफारस पात्र ठरले आहेत.
📜 खुल्या पाच पदांवरील रिक्त पदांवर शिफारस करताना आधीच्या निकालातील क प्रवर्गातून पात्र ठरलेले उमेदवार संदिप बाबासाहेब दातीर आता खुल्या प्रवर्गातून शिफारसीसाठी पात्र ठरले आहेत. क प्रवर्गातील इतर उमेदवार उपलब्ध नसल्याने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
📌 शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची शिफारसे पत्रे त्यांच्या प्रोफाऊलवर उपलब्ध करण्यात आली आहेत. शिफारस पात्र उमेदवारांनी आयोगाचे शिफारसपत्र मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाकडे खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. पत्ता : वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, नववा मजला, गो.ते. रुग्णालय संकुल इमारत, मुंबई - 400002.
MPSC State Services Prelims Result 2022: असा पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम mpsc.gov.in या MPSC च्या अधिकृत साइटवर जा.
👉त्यानंतर होम पेजवर उपलब्ध MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा
👉 आता एक नवीन पीडीएफ फाईल उघडेल.
येथे उमेदवार निकाल तपासू शकतात.
👉त्यानंतर पीडीएफ फाईल डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी प्रिंट काढा
मुख्य परीक्षेच्या तारखा
महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व लेखी परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. तर आता या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येणार असून ही परीक्षा मे महिन्यात होईल. मुख्य परीक्षा मे महिन्यात ७,८ आणि ९ मे २०२२ रोजी होणार आहे