टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या 13 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या 13 मे 2022

Top Post Ad

● जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र या, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन 

● वसतिगृह व सांस्कृतिक भवनाचे काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा इशारा

● मोसमी पाऊस रविवारी अंदमानात; पाच दिवस आधीच दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज 

● ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, एमआयएमचा राज ठाकरेंना खोचक टोला

● संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 1 जून पासून, सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यावर विद्यापीठाचं शिक्कामोर्तब

● डी-गँगशी संबंध असलेल्या दोघांना अटक, छोटा शकीलच्या सोबतीने गैरव्यवहार, NIA ची कारवाई 

● भारताची कोविड-19 लसींचे 5 अब्ज डोस तयार करण्याची क्षमता, WHO मान्यताप्राप्त 4 लसींची निर्मिती : पंतप्रधान मोदी

● राज्यसभेच्या ५७ खासदारांच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून सहा खासदार निवडून जाणार, तर महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी मोठी चुरस दिसण्याची शक्यता 

● छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर क्रॅश, या अपघातात दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती 

● युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर, 10 जून रोजी होणार मतदान 

▪️ रायगडात ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा, एसटीची सेवा पूर्ववत, दररोज 1 हजार 698 फेऱ्या सुरू 

▪️ नीट परीक्षा स्थगित करण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची मागणी, आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

▪️ नोएडाजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ भाविकांचा मृत्यू, दुर्घटनेत पुण्यातील काही जणांचा मृत्यू 

▪️ बीड-अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात, बीडमधील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण जागीच ठार

▪️ जाती, धर्मामध्ये जाणीवपूर्वक विद्वेष निर्माण करण्याचा काही शक्तींचा डाव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टीकास्त्र 

▪️ पुण्यातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरण : रुबी हॉलच्या मॅनेजिंग ट्रस्टीसह डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

▪️ केंद्र सरकारने निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नुकतेच रेल्वे मंत्रालयाने १९ अधिकाऱ्यांना सक्तीची व्हीआरएस दिली आहे 

▪️ मंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, सांगलीतील आटपाडी ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार 

▪️ भारतीय वैद्यकीय संघटनेकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहीत नीट पीजी परीक्षा २०२२ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे

 आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

Below Post Ad