☄️ अवकाशातील कचरा ( Space debris ) म्हणजे काय ? विदर्भात आकाशातून जमिनीवर पडललेल्या धातू सदृश्य वस्तूमागचे तथ्य काय ? ☄️
Type Here to Get Search Results !

☄️ अवकाशातील कचरा ( Space debris ) म्हणजे काय ? विदर्भात आकाशातून जमिनीवर पडललेल्या धातू सदृश्य वस्तूमागचे तथ्य काय ? ☄️

Top Post Ad

 ☄️ अवकाशातील कचरा ( Space debris ) म्हणजे काय ? विदर्भात आकाशातून जमिनीवर पडललेल्या धातू सदृश्य वस्तूमागचे तथ्य काय ? ☄️           
                                                           


                                                                                                                                                                                                                                                                      
       शनिवारी अवघ्या राज्याने मराठी नव वर्षाचे दमदार स्वागत केले. करोनावरील सर्व निर्बंध उठवल्यानंतरचा आणि मास्क मुक्तीचा हा पहिला दिवस होता. हा दिवस संपत असतांना विदर्भातील काही भागात रात्री आठच्या सुमारास प्रकाशमय गोष्ट अग्नी गोळ्याच्या स्वरुपात आकाशात एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जातांना अनेकांनी बघितली. अनेकांचे याचे मोबाईलमध्ये चित्रणही केले. सुरुवातील तो उल्का वर्षाव वाटला. त्यानंतर वर्धा आणि चंद्रपुरमध्ये काही ठिकाणी अग्नी गोळ्याच्या स्वरुपातील ही गोष्ट जमिनीवर पडल्याचं लोकांनी सांगितलं. काही तासातच या गोष्टी धातूच्या असल्याचं स्पष्ट झालं. काही ठिकाणी थातूच्या रिंग सापडल्या तर काही ठिकाणी धातूचे गोळे सापडले. या धातू सदृश्य वस्तुंवरुन हे रॉकेटचे अवशेष असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात या वस्तुंना अवकाश कचरा – Space debris म्हणून ओळखले जाते.      
                                                                                                                                                                                                ☢️ अवकाश कचरा – Space debris म्हणजे काय ? ☢️
                ४ ऑक्टोबर १९५७ ला सोव्हिएत रशियाने स्फुटनिक नावाचा ८४ किलो वजनाचा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवला आणि कृत्रिम उपग्रहाचे युग सुरु झाले. हा उपग्रह पृथ्वीपासून २१५ ते ९४० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीभोवती फिरत होता.काही दिवसांनंतर हा उपग्रह निकामी झाला आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीकडे खेचला जात पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट झाला.  १९५७ पासनू आत्तापर्यंत आठ हजार पेक्षा जास्त विविध आकाराचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले असून यापैकी एक हजारपेक्षा जास्त उपग्रह सध्या कार्यरत आहे.उर्वीरत उपग्रहांपैकी काही उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट झाले असले तरी अनेक उपग्रह हे विविध उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहेत. यालाच अवकाश कचरा असं म्हणतात.
                फक्त कृत्रिम उपग्रहांमुळे अवकाश कचरा तयार होतो असं नाही तर हे उपग्रह नियोजित उंचीवर नेण्यासाठी, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर नेण्यासाठी अत्यंत शक्तीशाली रॉकेटचा – प्रक्षेपकांचा वापर केला जातो. रॉकेट जरी एकसंध दिसत असलं तरी ते वेगवेगळ्या टप्प्यात काम करत असतं. ठराविक उंची गाठल्यावर रॉकेटच्या काही भागाचे काम संपते आणि तो भाग हा मुख्य रॉकेटपासून वेगळा होतो आणि रॉकेटच्या पुढचा टप्पा कार्यन्वित होत असतो. तेव्हा  निकामी झालेले रॉकेटचे भाग हे पृथ्वीभोवती वेगाने काही काळ फिरत रहातात. काही वेळा हे रॉकेटचे भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचले जात वातावरणात घर्षणाने नष्ट होतात. तर काही भाग हे जळत जमिनीवर येऊन आदळतात. तेव्हा विदर्भात रात्री आकाशात जो अग्नीचा गोळा, प्रकाशमय वस्तू बघाला मिळाली तसंच वर्धा- चंद्रपूरमध्ये जे थातूचे भाग सापडले ते वापर झालेल्या रॉकेटचे भाग – अवशेष असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
         असे निकामी झालेले उपग्रह, रॉकेटचे निकामी भाग वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतांना एकमेकांवर आदळले तर त्याचे आणखी तुकडे तयार होतात आणि अवकाश कचऱ्यात आणखी भर पडते.
           अवकाश कचरा हा फक्त काही उपग्रहामुळे, रॉकेटमुळेच तयार होतो असं नाही तर उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळेही अवकाश कचरा तयार होतो. उदा..भारताने एप्रिल २०१९ मध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी केली. म्हणजे काय तर जमिनीवरुन क्षेपणास्त्र डागत पृथ्वीभोवती वेगाने फिरणारा सुमारे ३०० किलोमीटर उंचीवरचा स्वतःचाच एक उपग्रह नष्ट केला. यामुळे या उंचीवर असंख्य तुकडे तयार झाले जे वेगाने पृथ्वीभोवती फिरायला लागले. अर्थात या उंचीवर कोणतेही उपग्रह नसल्याने उपग्रहांना धोका नव्हता आणि हे तुकडे काही दिवसांतच वातावरणात जळून नष्ट झाले. चीनने मात्र गेल्या दहा वर्षात अशा दोन चाचण्या केल्या ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उपग्रहांचे तुकडे होत अवकाश कचरा निर्माण झाला आहे.

Below Post Ad