टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या
▪️ चंद्रपुरमधील सिंदेवाहीत अवकाशातून कोसळलेल्या सॅटेलाईटची इस्रोकडून दखल, लवकरच तज्ज्ञांची टीम देणार घटनास्थळी भेट
▪️ विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा
▪️ कारवाई मान्य नसेल तर संजय राऊत यांनी न्यायालयात दाद मागावी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र
▪️ 'तुम मुझको कब तक रोकोगे...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान देणारे ट्वीट व्हायरल
▪️ माजी खासदार राजू शेट्टींचा 'एकला चलो'चा नारा; स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
▪️ बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात, अपघातात तीन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी
▪️ धक्कादायक! नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा घरासमोरच हत्या, या थरारक घटनेनंतर व्यावसायिक विश्व हादरलं
▪️ दारू पिऊन त्रास देतो म्हणून पत्नीनं गळा आवळून पतीचा जीव घेतल्याची घटना; अमरावतीमधील तिवसा इथल्या मोझरी गावातील घटना
▪️ वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला मुंबईत मोर्चा काढून आवाज उठवला जाणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
▪️ पारनेर नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नूतन नगराध्यक्ष विजय औटी यांची कर्मचाऱ्याला मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद