*टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या*
*Pawan Digital ll FastNews*
● आकाशात रहस्यमयी आगीचे गोळे; उल्कापाताची चर्चा; नागरिकांमध्ये कुतूहल; खान्देशातील जळगावपासून विदर्भ, मराठवाड्यासह सर्वच जिल्ह्यात हे दृश्य दिसले.
● सॅटेलाईट लोखंडी रिंग चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे मिळाली; रिंग पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पोलिसांनी रिंग घेतली ताब्यात
● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन झाले
● मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यापूर्वी शिवसेना भवनाच्या परिसरात झळकले राज ठाकरेंचे बॅनर्स
● हे सरकार लुटारूंचं, भाजपची लुटीत वाट्यासाठी वाटचाल, प्रकाश आंबेडकरांनी साधला निशाणा
● युवासेनेच्या वतीने रविवारी ३ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात व शहरात महागाई विरोधात 'थाली बजाओ' आंदोलन
● पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन
● अमरावतीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारली. कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली
● महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील : आदित्य ठाकरे
● काश्मीरचा मुद्या सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घेतल्यास आम्हीदेखील सकारात्मक पावले उचलू शकतो; पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे वक्तव्य
● भारत आणि नेपाळला जोडणारा रेल्वे मार्ग आजपासून खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करतील
● बिहारमधील पटना येथील NIT च्या विद्यार्थीनीला फेसबुकनं दिलं १.६ कोटींचं पॅकेज, कॉलेजचा रेकॉर्ड मोडला!
● गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभर सोने, घर आणि वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल; सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याची १०० कोटींची उलाढाल; मुंबई सराफा बाजारातही उत्साह
● निधी विनियोगात रायगड राज्यात अव्वल; जिल्हा आराखड्यातील १०० टक्के निधी खर्च; एक रुपयाचा निधीही शासनाकडे वापराअभावी समर्पित झालेला नाही
● इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा; रविवारी चंद्र दिसल्यानंतर रमजानच्या महिन्याला झाली सुरुवात
● श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे आणीबाणी; सरकारविरुद्ध असंतोष, हिंसक निदर्शने; भारताकडून तांदूळ- इंधनाचा पुरवठा
● भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार; पाच वर्षांत उलाढाल ५००० कोटी डॉलरवर नेण्याचे लक्ष्य; भारतातून निर्यात होणाऱ्या ९६ टक्के वस्तूंवर आता ऑस्ट्रेलियात शुन्य करआकारणी
● महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेतील महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e