▪️ खा. नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली, तसं काही घडलंच नाही, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण
▪️ शिवसैनिकांनीच घरावर हल्ला केला, आमदार रवी राणा यांच्या कुटुंबियांचा आरोप, या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज समोर
▪️ औरंगाबादेत जमावबंदीच्या चर्चेला पूर्णविराम! मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेमुळे औरंगाबादमध्ये जमावबंदी नाही, पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचं माहिती
▪️ खा.नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून राणा दाम्पत्याचा पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीटरद्वारे शेअर
▪️ सर्वांचे घोटाळे बाहेर आले म्हणून राज्य सरकार घाबरायला लागलंय, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
▪️ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला! आनंद करमुसे मारहाण प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली
▪️ समाजमाध्यमांवर तृतीयपंथीयांवर टीका केल्या प्रकरणी नाशिकच्या येवल्यात तृतीयपंथीय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, महंत शिवलक्ष्मी झाल्टे यांनी केली तक्रार
▪️ मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असणाऱ्या संपत्तीचीही माहिती सरकारला द्यावी लागणार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींचे फर्मान
▪️ बुलडाण्यात चित्रपटाला शोभेल अशी घटना! नवरदेव बसला वरातीत डीजेसमोर नाचत, लग्न मुहूर्तावर लागत नसल्याने वधुपित्याने मुलीचं लग्न लावलं दुसऱ्यासोबत
▪️ भंडाऱ्यात शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाच्या मोहिमेत बुरशीयुक्त जंतनाशक गोळ्या, शिक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या - 27 एप्रिल 2022
एप्रिल २७, २०२२
Tags