इम्रान खान : 'मी पाकिस्तानसाठी शेवटपर्यंत लढेन, राजीनामा देणार नाही'
Type Here to Get Search Results !

इम्रान खान : 'मी पाकिस्तानसाठी शेवटपर्यंत लढेन, राजीनामा देणार नाही'

चीननं अरुणाचलमधील 15 जागांची नावं बदलली, भारतानं कसं दिलं प्रत्युत्तर?

इम्रान खान सरकार खरंच धोक्यात आलंय का?

फोटो स्रोत,GETTY IMAGES

मी शेवटपर्यंत हार मानणार नाही, मी शेवटपर्यंत लढेन, असं म्हणत इम्रान खान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आज इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं.

यावेळी अमेरिकेचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर पाकिस्तानविरोधात कट रचल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेला मी सत्तेत नको आहे असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांचे विरोधक सत्तेत आलेले अमेरिकेला पाहिजेत असा आरोप त्यांनी केला आहे.

ज्या देशाच्या सरकारचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे, त्या सरकारला तुम्ही पाडायचे प्रयत्न केले, हे कुणी विसरणार नाही, असा इशारसुद्धा त्यांनी दिला आहे.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

इम्रान खान यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • मी पॉलिटिक्स हा विषय विद्यापीठात शिकलो. 25 वर्षांपूर्वी मी राजकारणात आलो तेव्हा पक्षाचा जाहीरनामा आणला. ज्यात न्याय, माणुसकी, स्वाभिमान (खुद्दारी) हे तीन प्रमुख बाबी होत्या.
  • माझ्याकडे सगळं काही होतं आणि आहे. तरीही मी राजकारणात आलो. 14 वर्षं तर लोकांनी माझी थट्टा उडवली. तुम्हाला राजकारणात यायची काय गरज आहे, असं लोक मला म्हणायचे.
  • मी पाकिस्तानचे चढ-उतार पाहिले आहेत. आम्ही शाळेत असताना पाकिस्तान कसा पुढे गेला, याची उदाहरणं दिली जायची. आपण पुढे चाललो होतो. मी याला खाली येताना पाहिलं. माझ्या देशाला अपमानित होतानाही पाहिलं.
  • मी कधीच कुणासमोर झुकणार नाही आणि माझ्या देशालाही झुकू देणार नाही, असं मी पहिल्यापासून म्हणत आलोय.
  • आपली परराष्ट्रनीती स्वतंत्र असेल, हे मी सांगितलं. याचा अर्थ आपण अमेरिकाविरोधी किंवा भारतविरोधी असा होत नाही.
  • क्रिकेटमुळे तर भारताला मी चांगलं ओळखतो. त्यामुळे मी कुणाच्याही विरोधात असू शकत नाही. या देशांच्या चुकीच्या धोरणांवर मात्र मी टीका करतो.
  • अमेरिकेसोबत जाऊन आपण युद्ध लढलो. पण दोन वर्षांनी त्याच अमेरिकेनं आपल्यावर निर्बंध लादले. ज्यापद्धतीनं आपल्या लोकांचे जीव गेले, अमेरिकेच्या कोणत्याही मित्र राष्ट्रानं अशाप्रकारे त्यांची मदत केली नव्हती.
  • ज्या देशासाठी तुम्ही लढलात तोच देश तुमच्या देशात येऊन ड्रोन हल्ला करेल, याची कधी कुणी कल्पना करेल का? पण आपले सत्ताधारी या गु्न्ह्यांत सहभागी झाले. पाकिस्तानी नागरिकांनी हे सगळं सहन केलं. त्यामुळे पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण केवळ पाकिस्तानी नागरिकांसाठी असेल, असं मी सांगितलं.
  • आज आपल्याला एक मेसेज आला आहे. तो माझ्याविरोधात नाहीये, तर आपल्या समुदायाविरोधात आहे. देशात आता जे काही होत आहे, ते बाहेरच्या लोकांना आधीच माहिती होतं. बाहेरील शक्ती पाकिस्तानात कट रचत आहेत.
  • आम्ही पाकिस्तानला तेव्हाच माफ करू, पण केव्हा जेव्हा इम्रान खान पायउतार होईल, असं त्या देशाचं म्हणणं आहे. इम्रान खान पंतप्रधानपदी राहिले, तर आपले संबंध खराब होतील, असं अधिकृत कागदपत्रांमधून समोर आलं आहे.
  • एका लोकनियुक्त पंतप्रधानांविरोधात जेव्हा एखादं दुसरं राष्ट्र असं बोलत असेल तर हीच आपली पात्रता आहे का? हे मला पाकिस्तानी नागरिकांना विचारायचं आहे.
  • माझ्याजागी जे येतील, त्यांच्याविषयी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं परराष्ट्र धोरण आम्हाला पसंत नाही. तुम्ही रशियाला का गेले, असा त्यांचा रोख दिसतो आहे. इथं बसलेल्या लोकांशी हाताशी धरून ते कट रचत आहेत.
  • बीबीसीनं देशातल्या नेत्यांच्या चोरीविषयी दोन डॉक्यूमेंट्री केल्या आहेत.
  • नवाज शरीफ चोरून चोरून नरेंद्र मोदींना भेटत होते, जेणेकरून पाकिस्तानी लष्करापासून त्यांचा बचाव होईल, असं बरखा दत्त यांच्या पुस्तकात लिहिलंय.
  • आम्ही शांततेत तुमच्यासोबत आहोत. पण युद्धाचं म्हणाल तर आम्ही तुमच्यासोबत नाही आहोत, असं मी म्हणत होतो.
  • रविवारी मतदान होईल आणि मग देशाचं भविष्य ठेरल. हा देश कोणत्या दिशेनं जाणार आहे ते ठरेल. ज्या लोकांवर 30 वर्षांपासून भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्या हातात देश जाईल का ते कळेल.
  • साडेतीन वर्षांत मी जी काम केलंय, ते माझ्या विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात कधीच केलं नाही. हे मी ठासून सांगतो.
  • इम्रान खान तुम्ही राजीनामा द्या, असं लोक मला सांगत होते. पण मी क्रिकेट खेळायचो. शेवटच्या चेंडूपर्यंत मी खेळतो. रविवारी जो काही निकाल येईल, त्यानंतर मी अधिक ताकदीनं समोर येईल.
  • आमचे जे लोक सौद्यासाठी बसले आहेत. त्यांना लोक कधीच विसरणार नाहीत. तुम्ही तुमच्या देशाचा सौदा केला, असं ते म्हणत राहतील.
  • ज्या देशाच्या सरकारचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण होतं, त्या सरकारला तुम्ही पाडायचे प्रयत्न केले, हे कुणी विसरणार नाही.
  • माझी माझ्या समुदायासाठी बांधिलकी आहे. मला काही कारखाने उभारायचे नाहीयेत. नवाज शरिफांनी 18 कारखाने काढले होते. माझे नातेवाईकही राजकारणात नाही. पण देशातल्या लोकांशी रविवारी जी गद्दारी होत आहे, ती तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा.
  • इम्रान खान चूप बसेल, या गैरसमजात राहू नका. मला सामना करायला जमतं. मला संघर्ष करता येतो.
  • हे ही वाचा. 👇👇

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section