April Fool : लोकांना 'येड्यात काढायची' फुल ऑन परमिशन देणारा हा दिवस आला तरी कुठून?
Type Here to Get Search Results !

April Fool : लोकांना 'येड्यात काढायची' फुल ऑन परमिशन देणारा हा दिवस आला तरी कुठून?

 April Fool : लोकांना 'येड्यात काढायची' फुल ऑन परमिशन देणारा हा दिवस आला तरी कुठून ?

● दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फुल डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांसोबत विनोद, मस्ती करतात, चेष्टा करताना दिसतात. 

● हल्ली तर लोक सोशल मीडियाच्या मदतीने या दिवसाचा विशेष आनंद घेतात. 

● मित्र, नातेवाईकांना 'एप्रिल फुल्स डे'वर मजेदार मीम्स, जोक्स आणि शायरी पाठवतात. 

● मात्र तुम्हाला एप्रिल फुल्स डे साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? चला, तर याचं कारण आज जाणून घेऊयात... 

👉 एप्रिल फुल डे साजरा करण्यामागे दोन कथा प्रचलित आहेत.

● पहिली कथा : इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी अ‍ॅनी यांनी 32 मार्च 1381 रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. या बातमीने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, कॅलेंडरमध्ये 32 मार्च ही तारीख नसते. राजा-राणीने लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 32 मार्च हा दिवस नाही म्हणून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आला होता.

● दुसरी कथा : फ्रान्समध्ये 1582 मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले. मात्र, त्यानंतरही काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते. त्यामुळे जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना एप्रिल फूल म्हटले गेले. तेव्हापासून 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आल्याचं बोललं जातं.

    Top Post Ad

    Below Post Ad

    Ads Section