*चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या उच्च तापमानाची नोंद*
⚡ महाराष्ट्रात पुढचे चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या आठवड्यापासून तापमान अधिक आहे.
👉 अनेक जिल्ह्यात तर तापमानाचा पारा 40 अंशाच्यावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी 43.4 अंश तापमान होते. त्यामु्ळे भारतातील सगळ्यात जास्त तापमान चंद्रपूरमध्ये असल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे तापमानाच्या बाबतीत चंद्रपूर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
🌤️ अकोल्यातही तापमान 43.1 अंशावर होते. अनेक जिल्ह्यात तापमानाची स्थिती 2 एप्रिलपर्यंत अशी राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
📍 दरम्यान, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान अधिक असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.