चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन क्षेत्रात मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या आंबेगड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३८ मध्ये वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी उघडकीस आली.
सोलापूर: 'मराठा समाजाचे आंदोलन हे आक्रमक असेल. जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे. या राज्य सरकारला झुकवल्या याशिवाय आता मराठा समाज गप्प बसणार नाही', असे मत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव येथील आठवडी बाजारात भंगार व्यावसायिक इंगळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाचा प्रमुख आरोपी आणि नगर पालिकेचा कर्मचारी आनंदमोहन अहिर याला आज शहर पोलिसांनी अमरावती येथून अटक केली आहे. घटनेच्या तब्बल सव्वा दोन महिन्यांनी मुख्य आरोपी आनंदमोहन अहिर आणि मुलगा आदित्य यांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं असून दोन्ही आरोपींना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अमरावती : करोना निर्बंधांवरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण करोना संसर्ग कमी झाला असला तरी सावधगिरी बाळगत सरकारने यंदाच्या वारीलाही विविध निर्बंधांसह परवानगी दिली आहे. करोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी फक्त १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी वारकऱ्यांच्या काही संघटना मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेत असून त्यांनी आक्रमक इशारा दिला आहे.
मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवी घोषणा करत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असं मलिक यांनी सांगितलं आहे.
SHORT NEWS
> सप्टेंबरपर्यंत ब्लॅक फंगसच्या औषधी टॅक्स; पण कोरोना व्हॅक्सीनसह मेडिकल ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर 5% कर लागणारच
> महाराष्ट्रात 1,55,474 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 56,31,767 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,08,333 रुग्णांचा मृत्यू