◼️ 1 मे महाराष्ट्र दिन. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानांतून महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो.
👷🏻 महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच जागतिक पटलावर आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कर्तृत्व साजरे करण्यासाठी, त्यांच्या शोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा जगभर साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन, कामगार दिन आणि मे दिन या नावानेही हा दिवस साजरा करतात.
♨️ कामगार दिनाचा इतिहास
1989 मध्ये मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा ठराव मंजूर केला. त्यात त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली.
🛐 कामगारांचे पूर्वी मोठ्या प्रमाणात शोषण होत होते. दिवसातील 15-15 तास त्यांना राबवले जात. याविरुद्ध 1886मध्ये कामगार एकत्र आले. त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगारी रजेची मागणी केली.
🤷🏻♂️ भारतात चेन्नईमध्ये 1923मध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला. 'लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडिया'ने हा दिवस साजरा केला. कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनी सरकारला सांगितले, की कामगारांच्या प्रयत्नांचे, कार्याचे प्रतीक म्हणून हा दिवस 'राष्ट्रीय सुट्टी' म्हणून जाहीर करावा.
◆ हा दिवस अमेरिका मध्ये साजरा केला जात नाही.
🚫 दरम्यान, कामगार दिनी निषेध, संप आणि मोर्चे काढले जातात. यंदा कोरोनोमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे छोट्या स्वरुपात कार्यक्रम साजरे केले जात आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖