💉 महाराष्ट्रात आजपासून लसीकरण
राज्यात आजपासून (ता. १ मे) कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, सध्या लसीचा तुटवडा असल्याने जसजशा लसीचा साठा मिळेल, तशी लसीकरण मोहिमेला वेग देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
😊 राज्यात विक्रमी रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात ६९,७१० रुग्णांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.06 टक्के इतके झाले आहे. राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झालेे.
पण दुसरी लाट तरुणांसाठी प्राणघातक ३१ ते ५० वयोगटातील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.
📌 राज्याला १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी लसमात्रांची (सहा कोटी नागरिकांसाठी प्रत्येकी दोन मात्रा) आवश्यकता असली तरी मे महिन्यात राज्याला केंद्राकडून १८ लाख लसमात्राच उपलब्ध होणार आहेत. आगाऊ रक्कम देऊन लसमात्रा खरेदी करण्याची राज्याची तयारी असली तरी दोन्ही कंपन्यांची मर्यादा लक्षात घेता वाढीव मात्रा लगेचच मिळण्याची शक्यता नाही.
📌 केंद्रसरकार ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी केंद्रांवरच लस देणार तसेच
ब्रिटनकडून भारताला लस मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ब्रिटनने ही चर्चा फेटाळून लावली आहे. आमच्याकडे लशीचा अतिरिक्त साठा नसल्याने भारताला लस देऊ शकत नसल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.
😱 _*निवडणूक आयोगावरच हत्येचा आरोप*_
पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार काजल सिन्हा यांचा मृत्यू झाला. सिन्हा यांच्या पत्नीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
😷 _*हुसेन रुग्णालयातील २८ जणांना कोरोना*_
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. आता याच रुग्णालयातील २८ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
💥 _*बॉम्बस्फोटात महिलेसह तरुण जखमी*_
नगर तालुक्यातील नारायणडोह येथे शेतात सापडलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यात महिलेसह एक तरुण जखमी झाला. हा बॉम्ब जुन्या काळातील होता. त्याचा भडका न उडाल्याने मोठा अनर्थ टळला.
🤷🏻♂️ _*रिलायन्स इंडस्ट्रिजला नफा*_
रिलायन्स इंडस्ट्रिजला जानेवारी ते मार्च 2021 मध्ये तब्बल 13,227 कोटी रुपयांचा नफा झाला. वर्षभरात 108.4 टक्क्यांनी आणि तिमाहीनुसार एक टक्क्यांनी नफ्यात वाढ झाली. कंपनीने प्रति शेअर 7 रुपये लाभांशची घोषणा केली आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
*🤑 मंदीचा फायदा उचला आणि शेअर मार्केट मधून बक्कळ पैसे कमवा..*
*त्यासाठी डीमॅट खाते उघडा अगदी मोफत* 👇
https://bv7np.app.goo.gl/xmrQ
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
📌 IPL 2021: हरप्रीतच्या गोलंदाजीवर बंगळुरुचा भांगडा; ३४ धावांनी पंजाबचा विजय तर पंजाबचा हरप्रीत ब्रार सामनावीर
📌 *रेमडेसिविरच्या ४.५ लाख कुप्या केंद्र सरकारकडून इतर देशातून आयात करणार
📌 फेरीवाले, गृहसेविकांना १५०० रुपये मदत करण्यासाठी राज्य शासनाने त्यासंबंधीचे दोन स्वतंत्र आदेश जारी करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.
📌 *मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं 34 व्या वर्षी करोनामुळे निधन*
🙏 *ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा*
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
💁🏻♂️ *बातम्या, नोकरी व माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी...*