🌊 तौत्के चक्रीवादळ : किनारपट्टीवरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा
Pawan Digital Service
● या वादळाची कसे सरकते, हवा कोणत्या दिशेने आहे हे पाहण्यासाठी खालील लिंक Open करा..
https://zoom.earth/storms/tauktae-2021/#layers=wind,fires
◆ म्यानमारने 'तौक्ते' असे नामकरण केले आहे. तौक्तेचा अर्थ गीको ''Gecko" असा होता. गीको हा बर्मीस येथे आढळणारा सरडा आहे. या सरड्याच्या नावावरून वादळाला नाव देण्यात आले आहे. तसेच यंदा येणाऱ्या वादळाची नावे बुरेवी (मालदीव), तौक्ते(म्यानमार), यास (ओमान) आणि गुलाब (पाकिस्तान) अशी असणार होती. एप्रिल 2020 मध्ये या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.
◆ ही सर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आहेत. यापूर्वी भारतात निसर्ग, अम्फान, क्यार, महा, बुलबुल, वायू, फनी ही चक्रीवादळे आली होती. यापूर्वी 2018 ला 'गाजा' नावाच्या वादळाने तामिळनाडूमध्ये प्रचंड नुकसान केले होते.भारतानेही सुचविली चक्रीवादळांची नावे -भारतीय हवामान खात्याला चक्रीवादळाची नावे सुचविणे बंधनकारक आहे. त्यासाठी हवामान खात्याला काही प्रक्रियाही पूर्ण कराव्या लागतात.
◆ भारतीय हवामान खात्याने यापूर्वी काही चक्रीवादळांची नावे सुचविली होती. यामध्ये अर्णव, निसर्ग, आग, अझर, प्रभंजन तेज, गती व लुलू या नावांचा समावेश आहे.कोण ठरवतं वादळांची नावे? जागतिक हवामान संघटना, आशिया आणि प्रशांत महासागरासाठीच्या संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने बंगाल आणि अरबी समुद्रात येणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची नावे देण्यासाठी पॅनल निश्चित केले.
◆ या पॅनलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या 13 देशांचा समावेश आहे. आठ देशांनी 2004 मध्ये एकत्र येऊन हे पॅनल सुरू केल होते. त्या देशांनी प्रत्येकी 8 अशी एकूण 67 नावांची यादी तयार केली होती.
◆ त्या यादीतील अम्फान हे शेवटचे नाव होते. त्यानंतप या यादीत निर्सग हे नाव टाकण्यात आले. निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशने दिले होते.
◆ 2018 मध्ये या पॅनलमध्ये आणखी इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 169 नावांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली होती. 13 देशांनी प्रत्येकी 13 नावं सुचवली होती.
◆ चक्रीवादळाला नावं दिल्याचा फायदा -चक्रीवादळाला नावं दिल्याने त्यामधून जनजागृती होते आणि मोठ्या प्रमाणात लोकांना धोक्याचा इशाराही परिणामकारकतेने मिळतो.
◆ चक्रीवादळाचे नाव राजकारण, लिंग, प्रदेश व संस्कृती यासंदर्भात नसावे, ही हवामान खात्याकडून काळजी घेण्यात येते.
◆ चक्रीवादळाचे नाव हे लहान आणि उच्चारण्यास सोपे असण्यावर हवामान खात्याचा भर असतो. विशेषतः ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण केलं जातं. चक्रीवादळांची नावे निश्चित केल्याने वैज्ञानिक समुदायाला आपत्कालीन व्यवस्थापनाला मदत होते.
🧐 अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या 'तौत्के' चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
💥 *तौत्के चक्रीवादळाचा परिणाम :*
🌀 रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
🌀 सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद उमटले असून, पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्यामुळे रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज बंद करण्यात आली आहे.
🌀 मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.
🌀 बिकेसी, दहिसर आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर केले आहे.
🌀 नाशिक जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा आपत्कालीन विभागानेही हाय अलर्टचा संदेश दिला आहे.
🛣️ *गोवा आणि कर्नाटकात मोठे नुकसान :* गोव्यासह कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले असून वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जिल्ह्यांतील जवळपास ७३ गावांना झोडपून काढले आहे. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे.
🛣️ *केरळमध्ये हाहाकार :* केरळमध्ये काही भागात पाणी तुंबले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरु आहे. तिरुअनंतपुरम मधील गावांत किनाऱ्याजवळील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
📍 सध्या हे चक्रीवादळ प्रतितास १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून उद्या गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील १२ तासांत वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची भिती हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
👍 केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधता आवश्यक सुचना दिल्या.
संकलन:- योगेश शिकारे सर, पवन करिअर अकॅडमी, अंबड
📱 *सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.*
https://cutt.ly/6bkjqwl