● चालूघडामोडी
*🌧️तौकते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले.*
🖌️तौकते चक्रीवादळ 16 मे 2021 रोजी अधिक तीव्र झाले. वेधशाळेने या वादळाने ‘व्हेरी सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म’ म्हणजे अतितीव्र चक्रीवादळाची पातळी गाठली असल्याचे जाहीर केले आहे.
🖌️तौकते चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्याला समांतर गुजरातकडे वाहत जाणार आहे. 18 मेच्या पहाटे गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
🖌️चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.
🖌️म्यानमार देशाने अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या ‘तौकते’ नामक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचे नामकरण केले आहे.निसर्गचक्र चालताना ऋतुत बदल होत असताना वारे बदल होतात.
🖌️हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात, त्यांना चक्रीवादळे असे म्हणतात. वादळांचे एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
*🏆लिस्टर सिटीला जेतेपद*
🖌️लिस्टर सिटीने बलाढय़ चेल्सीचा १-० असा पराभव करत एफए चषकावर नाव कोरले.
लिस्टर सिटीने क्लबच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एफए चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.
🖌️यौरी टिलेमान्स याने ६३व्या मिनिटाला केलेला गोल स्पर्धेच्या १४९ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरला.टिलेमान्सने ३० मीटरवरून मारलेला फटका थेट गोलजाळ्यात गेला.
🖌️याआधी लिस्टर सिटीला चार वेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
१९६९मध्ये त्यांनी अखेरच्या वेळी एफए चषकाची अंतिम फेरी गाठली होती.
🖌️थॉमस टकेल यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या चेल्सीने पहिल्या सत्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
*🥇तेजस्विनने यूएसमध्ये जिंकले सुवर्णपदक*
🖌️भारतीय उंच उडीपटू तेजस्विन शंकरने अमेरिकेतील मॅनहट्टनमध्ये बिग १२ आउटडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
🖌️कॅनसस राज्य विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना तेजस्विनने शनिवारी २.२८ मीटर उडी घेत ही कामगिरी साधली. त्याचे चालू सत्रातील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी ठरली.
🖌️त्याने यापूर्वी २०१८ मध्ये २.२९ मीटर उडी घेत राष्ट्रीय विक्रम बनवला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमाच्या वार्नोन टर्नरने (२.२५ मी.) रौप्य व टेक्सास टेक युनिव्हर्सिटीच्या जेक्वान होगनने (२.११ मी.) कांस्यपदक जिंकले.
तेजस्विनचे हे स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक ठरले.
*🖥️देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाइन वैद्यकीय परिषद*
🖌️राज्यातील सर्व डॉक्टर्सना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी करणाऱ्या " माझा डॉक्टर" या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनव संकल्पनेस झपाट्याने प्रतिसाद वाढत असून आज राज्यभरातील
🖌️अगदी गाव पातळीवरील सुमारे १७ हजार ५०० फॅमिली फिजीशियन्स, वैद्यकीय चिकित्सक यांच्याशी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी सुमारे दोन तास संवाद साधून कोविडवरील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले.
🖌️इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या राज्याने ऑनलाईन वैद्यकीय परिषद घेऊन उपचारांबाबत फॅमिली डॉक्टर्सना मार्गदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी प्रतिक्रिया येत आहे.
🖌️विशेष म्हणजे हजारो नागरिकांनी देखील या परिषदेत दर्शक म्हणून हजेरी लावली, तसेच आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत या लढाईत उतरावे, घरीच राहून उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांच्या योग्य उपचाराचे शिवधनुष्य सर्व माझा डॉक्टरांनी उचलावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनि आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविकात केले.
*📟रेल्वेचे वायफाय सहा हजाराव्या स्थानकावर*
🖌️देशात झारखंडमधील हजारीबाग शहरातील रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय शनिवारी सुरू करण्यात आले असून वाय फाय सुविधा असलेले ते सहा हजारावे स्थानक ठरले आहे.
🖌️रेल्वेने वायफाय सुविधा मुंबई रेल्वे स्थानकावर २०१६ मध्ये मोफत सुरू केली होती. त्यानंतर पाच हजार स्थानकांवर ती उपलब्ध करण्यात आली. त्यात मिदनापूर हे पाच हजारावे रेल्वे स्थानक होते.
🖌️१५ मे रोजी ओडिशातील अंगुल जिल्ह्यात जरपडा येथे वायफाय सेवा सुरू करण्यात आले.वायफाय सेवा रेल्वे स्थानकांवर मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे भारत सरकराच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला पाठबळ मिळाले आहे.
🖌️ग्रामीण व शहरी नागरिक आता डिजिटल साधनांचा वापर करू शकतात. वायफाय सुविधा सध्या सहा हजार रे स्थानकांवर मोफत देण्यात आली आहे.
*राज्यांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा*
🖌️राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
🖌️केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे. १४ मे रोजी वाया गेलेली लस वगळता १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ७७२ लस मात्रा वापरण्यात आल्या आहेत.
🖌️अजून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ४७८ लस मात्रा राज्यांकडे शिल्लक आहेत. काही राज्यांकडे ऋण शिल्लक दाखवत असून पुरवलेल्या लशींपेक्षा वापर जास्त आहे.
🖌️यातील काही लशी लष्करी दलांसाठी पुरवण्यात आल्या होत्या. पुढील तीन दिवसांत ५० लाख ९१ हजार ६४० लशीच्या मात्रा राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना दिल्या जाणार आहेत. चाचणी करा, संपर्क शोधा, उपचार करा व कोविड सुसंगत वर्तन ठेवा या मुद्दय़ांवर भर देण्यात येत असला तरी कोविड नियंत्रणात लसीकरण हा प्रमुख टप्पा आहे.
*🚰ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्राची नवी नियमावली*
🖌️देशात कोरोना रुग्णांची संख्या आता शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावली जाहीर केली आहे.
🖌️नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला आहे. तर आशा कार्यकर्त्यांना यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
🖌️आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि उप केंद्रात हे टेस्ट किट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
🖌️प्रत्येक गावागावात जाऊन आशा कार्यकर्त्यांना सर्दी तापाची नोंद करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत सॅनेटायझेशन आणि न्यूट्रिशन कमिटीही असणार आहे.
🖌️ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येतील त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
🖌️या दरम्यान कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांनी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे.
*✒️संक्षिप्त घडामोडी*
● राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख घसरू लागला! 24 तासांत कोरोनाचे 34 हजार 389 नवे रुग्ण आढळले; 974 रुग्णांचा मृत्यू
● ऑक्सिजन आणि वीजपुरवठा खंडीत न होण्यासाठी खबरदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत माहिती
● पुण्यात आज (दि.17) कोरोनाविरोधी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद राहणार; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती.
● ग्रामीण भागातील फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना; देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर
● राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत 51 लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून 1.84 कोटी मात्रा शिल्लक; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
● इस्रायलच्या हवाई हल्ल्यात रविवारी गाझामध्ये 42 जण ठार झाले असून तीन इमारती झाल्या जमीनदोस्त; पन्नास जण जखमी
● जपानसाठी ऑलिम्पिक आत्मघातकी! आगामी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन म्हणजे आत्महत्येची मोहीमच ठरेल; जपानमधील अब्जाधीश उद्योजक मिकिटानी यांची टीका
● मुंबई, गोवा नंतर ओडिशामध्येही शूटिंगला बंदी ! मेकर्सचं होतंय नुकसान; इनडोअर आणि आउटडोअर शूटिंगसाठी घातली बंदी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👬 *हि माहिती मित्रांना पण शेअर करा.