📅 दिनविशेष
🔰 06 एप्रिल 2021 🔰
🔰 जन्म: 🔰
🔖 *1864*: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म.
🔖 *1928*: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म.
🔰 मृत्यू: 🔰
🔖 *1983*: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन.
🔰 घटना:🔰
🔖 *1656*: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
🔖 *1896*: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
🔖 *1917*: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
🔖 *1930*: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
🔖 *1965*: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
🔖 *1966*: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
🔖 *1980*: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
🔖 *1998*: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
🔖 *1998*: स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
🔖 *2000*: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले
▪️▪️▪️▪️▪️▪️
👬 हि माहिती मित्रांना पण शेअर करा.