>> करोनाचा विस्फोट ! देशात एका दिवसात दोन लाखांहून अधिक रुग्णांची भर, मृत संख्या आणि संक्रमण - वाचा सविस्तर
Type Here to Get Search Results !

>> करोनाचा विस्फोट ! देशात एका दिवसात दोन लाखांहून अधिक रुग्णांची भर, मृत संख्या आणि संक्रमण - वाचा सविस्तर

 

करोनाचा विस्फोट! देशात एका दिवसात दोन लाखांहून अधिक रुग्णांची भर..

>> करोना संक्रमणानं देशाला बेजार केल्याचं सद्य परिस्थितीवरून दिसतंय. भारतात करोना संक्रमणाचा वेग पुन्हा एकदा धडाक्यानं वाढलाय. करोना संक्रमणाचे आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठत नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसतोय. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्या रुग्णांचाही समावेश आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यानं लहानग्यांच्या मृत्यूचंही प्रमाण वाढताना दिसून येतंय.

>> बुधवारी २४ तासांत करोनाबाधित एकूण २ लाख ७३९ रुग्णांची भर पडलीय. भारतात करोना दाखल झाल्यापासूनचा हा देशातील एका दिवसाचा सर्वात मोठा आकडा ठरलाय. याच २४ तासांत १ हजार ०३८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

>> आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

>> आयसीएमआर (ICMR)नं दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी देशात १३ लाख ८४ हजार ५४९ नमुन्यांची करोना तपासणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी २० लाख ०३ हजार ४१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.

गेल्या काही दिवसांत संक्रमित रुग्णांची संख्या
१ एप्रिल : ८१ हजार ३९८
२ एप्रिल : ८९ हजार ०२३
३ एप्रिल : ९२ हजार ९९४
४ एप्रिल : १ लाख ०३ हजार ४९४
५ एप्रिल : ९६ हजार ५६३
६ एप्रिल : १ लाख १५ हजार ३१२
७ एप्रिल : १ लाख २६ हजार ७८९
८ एप्रिल : १ लाख ३१ हजार ८७८
९ एप्रिल : १ लाख ४४ हजार ८२९
१० एप्रिल : १ लाख ५२ हजार ८७९

११ एप्रिल : १ लाख ६८ हजार ९१२

१२ एप्रिल : १ लाख ६१ हजार ७३६
१३ एप्रिल : १ लाख ८४ हजार ३७२
१४ एप्रिल : २ लाख ७३९

गेल्या काही दिवसांतील मृतांची संख्या
१ एप्रिल : ४६८
२ एप्रिल : ७१३

३ एप्रिल : ५१४

४ एप्रिल : ४७७
५ एप्रिल : ४४६
६ एप्रिल : ६३०
७ एप्रिल : ६८५
८ एप्रिल : ८०२
९ एप्रिल : ७७३
१० एप्रिल : ८३९
११ एप्रिल : ९०४
१२ एप्रिल : ८७९
१३ एप्रिल : १०२७
१४ एप्रिल : १०३८

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section