✒️ राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; कोल्हापूर, सांगली, नाशिक, रत्नागिरी, परभणी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश
✒️आरबीआय मुख्यालय उडवून देण्याची धमकी; ईमेलबाबत माहिती मिळताच पोलिसांनी रिझर्व्ह बँके च्या इमारतीभोवतीची सुरक्षा वाढवली.
✒️तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा; काश्मिरात लष्कराची मोठी कारवाई
✒️ मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससमवेत बैठक: राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
✒️ SRH vs KKR : चेन्नईत कोलकाताची हैदराबादवर सरशी; मनीष पांडे, बेअरस्टो यांची अर्धशतके व्यर्थ
✒️ आयपीएल 2021 : KKR चा SRH वर 10 धावांनी विजय, कोलकाताने 20 ओव्हरमध्ये केल्या 6 बाद 187 धावा, प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने 20 ओव्हरमध्ये केल्या होत्या 5 बाद 177 धावा
✒️ महाराष्ट्रात 5,65,587 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 27,82,161 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 57,987 रुग्णांचा मृत्यू
✒️ आरबीआय मुख्यालय उडवून देण्याची धमकी; 8 एप्रिलला रिझर्व्ह बँके च्या एका विभागास धमकीचा ईमेल प्राप्त, त्यात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा उल्लेख
✒️ दिल्लीतील नोएडा सेक्टर 63 मधील बहलोलपूर झोपडपट्टीत अग्नीतांडव: सिलेंडरच्या स्फोटामुळे 500 झोपड्या जळून खाक, आगीत 2 चिमुकलींचा मृत्यू; 1600 झोपडपट्ट्यात 6000 लोक राहतात
✒️ भारतात 11,95,960 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,21,53,713 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,70,209 रुग्णांचा मृत्यू
✒️ रेमडेसिविर आणि पीपीई किटवर लावण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर माफ करावा, सजग नागरिक मंचने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अशी मागणी
✒️ महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे करण्यात आले लसीकरण, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली माहिती
✒️ एफआयएच प्रो हॉकी लीग : भारताची अर्जेंटिनावर मात, पेनल्टी-शूटआऊटमध्ये ऑलिम्पिक विजेत्यांवर 3-2 अशी सरशी
✒️ पर्यावरणासंबंधित कामासाठी अभिनेता अक्षय कुमार व हॉलिवूड अभिनेता लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे पुरस्कार
🙏 ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा
Join on Telegram: https://t.me/pawanacademyambad
अशीच माहिती मिळवा Whatsapp वर. यासाठी लिंक उघडून Join Whatsapp करा.
https://cutt.ly/5clQqcN
(Note : लिंक Open होत नसेल तर Copy करून Pest करा )