IMP घडामोडी
⚡ राज्यात आज दिवसभरात 55 हजार 411 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
👉🏻 राज्यात आज दिवसभरात 53 हजार 005 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 टक्के एवढे झाले आहे.
✍🏻 राज्यात आत्तापर्यंत एकूण 27 लाख 48 हजार 153 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 5 लाख 36 हजार 682 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
✨दरम्यान, कोरोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार असून त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय असल्याचा इशारा सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
*💉११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव*
New Pawan Career Academy
🖋️करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच करोनाचा फैलाव 'युद्धपातळीवर रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत.
🖋️असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभाध्याचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान 'लस महोत्सव आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
🖋️महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवा ची घोषणा पंतप्रधानांनी केली.
🖋️करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशाजवळ पूर्वीपेक्षा अधिक संसाधने असून, आता 'मायक्रो- कंटेनमेंट झोन्स' वर लक्ष केंद्रित करायला हवे यावर त्यांनी भर दिला.करोना महासाथीला आळा घालण्यासाठी 'चाचणी करा, शोध घ्या, उपचार करा' या पद्धतीवर मोदी यांनी भर दिला.
🏆 *विष्णू, गणपती-वरुण ऑलिम्पिकसाठी पात्र*
New Pawan Career Academy
🖋️भारतीय विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाच्या आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकावला.
🖋️भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. नेत्रा कुमानन हिने बुधवारी लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते.
🖋️स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाआधी विष्णू तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गुरुवारी त्याने थायलंडच्या किराती बुआलाँग याचा पराभव करत एकूण दुसरे स्थान पटकावत टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली.
🖋️त्यानंतर चेंगाप्मा आणि ठक्कर या डोडीने ४९ईआर क्लास प्रकारात गुणतालिकेत सर्वोत्तम स्थान पटकावत ऑलिम्पिकचे स्थान प्राप्त केले.या दोघांनी इंडोनेशिया येथे झालेल्या २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.
*🎫ऑलिम्पिकसाठी जपानच्या नव्या उपाययोजना*
New Pawan Career Academy
🖋️टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर करोना विषाणू संसर्गाचा धोका रोखण्यासाठी आता जपान सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.
🖋️जपानची राष्ट्रीय लसीकरण मोहीम मागे पडली असून राजधानी टोक्योमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांनी असमर्थता दर्शवली आहे.
🖋️ रात्रजीवनाचा तसेच खाण्यापिण्याचा आस्वाद घेत असताना करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा संसर्ग नंतर कार्यालये, शाळा येथे होत आहे.
🖋️ हे लक्षात घेता बार आणि रेस्टॉरंट्स थोड्या कालावधीसाठी सुरू ठेवण्याच्या सूचना पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिल्या आहेत.
🖋️नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ११ मेपर्यंत या नव्या प्रमाणित कार्यप्रणालीचे पालन जनतेला करावे लागणार आहे.
🖋️पश्चिम जपानमधील क्योटो आणि ओकिनावा येथे करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे सुगा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओसाका, ह योगो आणि मियागी या शहरांमध्येही सावधगिरीच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
*💰भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक*
New Pawan Career Academy
🖋️गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर पडली आहे.
🖋️गेल्या दशकभराच्या काळात सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली असतानाच भारताला करोना महासाधीचा फटका बसला.
🖋️ज्या ठिकाणी देशातील बहुतांश ग्राहक व गरीब लोक राहतात, त्या ग्रामीण भागावर मंदावणाच्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम झाला आहे.
🖋️ या संदर्भात कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ग्रामीण भागातील दारिद्र्यातील वाढ कुणाच्याही लक्षात येऊ शकते.
🖋️या भागात बेकारीचे प्रमाण मोठे होते ग्राहकांचा खर्च (कंझ्युमर एक्सपेंडिचर) सतत कमी होत होता आणि विकासावरील खर्च अवरुद्ध झाला होता. हे तीन घटक एखाद्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य ठरवतात.
🖋️प्रामुख्याने असंघटित कामगार आणि गरीब यांचा समावेश असलेल्या ग्रामीण भारतीयांनी २०२१ साली एक वर्षभराहून अधिक काळ अनियमित रोजगारासह दिवस काढले आहेत.
🖋️लोकांनी अन्नधान्यावरचा खर्च कमी केला आहे आणि धान्य महागल्यामुळे अनेकांनी मसुरीच्या डाळीसारखे प्राथमिक अन्नधान्य वापरणे सोडून दिले आहे
😥 *प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या ९९व्या वर्षी निधन*
🖋️ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन झालं आहे. बकिंगहम पॅलेसकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.
🖋️राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलीप यांचा १९४७ साली विवाह झाला होता. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक काळ सोबत व्यतीत केलेले पती-पत्नी होते.
🖋️अवघ्या आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलीप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून उपचारांनंतर पॅलेसमध्ये परतले होते. त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
🖋️ महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
🖋️"अतिशय दुःखाने राणी एलिझाबेथ यांनी जाहीर केले की त्यांचे पती प्रिन्स फिलीप, द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचे आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये निधन झालं.
*📹परीक्षा पे चर्चा तील सल्ल्याचे ट्विट संदेश अखेर मागे*
🖋️परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अवघड प्रश्न आधी सोडवण्याच्या दिलेल्या सल्ल्याची समाजमाध्यमावर विरोधी पक्ष व इतरांनी खिल्ली उडवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हवाल्याने दिलेले ट्विट केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोने काढून टाकले आहेत.
🖋️'अल्ट न्यूज' ने याबाबत खातरजमा करून हे ट्विट काढल्यात आल्याचे म्हटले आहे. शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधत असतात.
🖋️या वेळी त्यांनी आभासी पातळीवर हा कार्यक्रम घेतला. मोदी यांच्या या संवादाची चित्रफीत प्रसारित करण्यात आली असून त्यात त्यांनी अवघड प्रश्न आधी सोडवून त्याला जास्त वेळ देण्याचे स्पष्ट म्हटले आहे.
🖋️ सुरूवातीला मन ताजेतवाने असते, त्यामुळे तुम्ही अवघड प्रश्न प्रथम सोडवा. नंतर सोप्या प्रश्नांची उत्तरे लिहा असे त्यांनी म्हटले होते.
🖋️नेहमी परीक्षेत शिक्षक व पालक 'सोपे प्रश्न आधी सोडवा तर अवघड नंतर सोडवा' असे सांगत असतात पण मोदी यांनी नेमका उलटा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटली.
*✍🏻संक्षिप्त घडामोडी*
● रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोलरूम उभारणार! आरोग्य विभागाचे निर्देश
● राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता; आज टास्क फोर्सची बैठक पार पडल्यानंतर लवकरच निर्णय होणार
● नॉर्वेच्या पंतप्रधानांना कोव्हीड 19 चे नियम मोडणे पडले महागात, पोलिसांनी ठोठावला दंड
● महाराष्ट्राकडे 15.63 लाख डोस उपलब्ध आहेत - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
● केंद्राच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल.
● BSNL ने 398 रुपयांच्या प्रीपेड योजनेत केला मोठा बदल; आता ग्राहकांना 90 दिवसांसाठी घेता येणार अमर्यादित कॉलिंगचा लाभ
● आज कोलकत्ता भिडणार हैद्राबाद संघाशी; पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
👬 *हि माहिती मित्रांना पण शेअर करा*