💰बजेट 2021: काय झाले स्वस्त आणि काय महागणार जाणून घ्या!*
😷 कोरोनाचे जागतिक संकट देशावरही असताना केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये वित्तीय वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला.
💁♀️ या काळात संपूर्ण देशाला अर्थ मंत्र्यांकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी ही जनतेला नाराज केलं नाही. काही गोष्टींवरील आयात कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न झाला मात्र, करदात्यांना कुठलाच दिलासा मिळाला नाही. कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि काय महागणार आहे जाणून घेऊयात!
😍 *स्वस्त होणाऱ्या वस्तू:*
🍽️ स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किंमती आता कमी होणार आहेत. स्टीलची कस्टम ड्युटी 7.5 टक्क्यांवर आली आहे.
🥇 त्याचबरोबर सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात देखील घट झाली आहे
🧪 केमिकल वरील कस्टम ड्युटी कमी होणार
📱 भारतीय बनावटीचे मोबाईल
👜 तांब्याच्या वस्तू आणि चामड्या पासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार आहेत
👉🏻 नायलॉनवरील कस्टम ड्युटी कमी करून 5 टक्क्यावर आणि कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार
🧐 *महाग काय झाले?*
📱 मोबाईलच्या काही पार्ट्स वर कर वाढवण्यात आला आहे. परदेशी मोबाईल आणि चार्जर महागणार
💎 जेम्स स्टोन वर देखील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे.
🚗 परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवर देखील कर लादण्यात आला आहे, त्यामुळे वाहनांच्या किंमतीत देखील वाढ होऊ शकते.
🌞 अपारंपरिक ऊर्जा- सोलार पॅनल इन्व्हर्टर 5 वरून 20 टक्क्यांवर
👚परदेशातून आयात केले जाणारे कपडे आणि कॉटनचे कपडे महागणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧐 *केंद्रीय अर्थसंकल्पातील मुद्दे; काय स्वस्त आणि काय महाग होणार ?*
⚡ आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे.
💸 दरम्यान, अर्थसंकल्पामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या तर काहींचे दर वाढले आहेत.
🤔 *काय स्वस्त होणार ?*
• कातड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू
• ड्राय क्लिनिंग होणार स्वस्त
• लोखंडापासून तयार होणारी उत्पादने
• रंग स्वस्त होणार
• स्टीलची भांडी स्वस्त होतील
• विमा
• वीज
• चपला
• नायलॉन
• सोने चांदी
• पॉलिस्टर
• तांबे धातूच्या वस्तू
• शेती उपकरणे
🤔 *काय महाग होणार ?*
• मोबाइल आणि चार्जर महाग
• सूती कपडे महागणार
• इलेक्ट्रिक साहित्य
• रत्ने महाग होणार
• लेदरचे बूट महागणार
• सोलर इन्व्हर्टर महाग होणार
• फळे
• युरिया
• डीएपी खते
• चना डाळ
• पेट्रोल डिझेल महागणार
• दारु महाग
• ऑटो पार्ट्स
📊 *अर्थसंकल्पातील तरतुदी अशा*
*1)* १७ आपत्कालीन आरोग्य केंद्रे आणि कोविड- १ ९ च्या लसींसाठी ३५,००० कोटी रुपये
*2)* सोने आणि चांदीवर कस्टम ड्युटी 12.5 % कमी
*3)* इंधन दरात वाढ , पेट्रोल 2.5 रुपये आणि डिझेल 4 रुपये फार्म उपकर
*4)* परवडणाऱ्या घरासाठीची उपाययोजना , 1 वर्षासाठी आणि 1.5 लाख व्याजमुक्त
*5)* महिला कमीतकमी वेतन , शिफ्टमध्ये काम करू शकतात
*6)* ग्राहक वीज प्रदाता निवडू शकतो
*7)* ग्रामीण इन्फ्रासाठी 40 हजार कोटी. 16.5 लाख कोटी कृषि पत , 5 मेगा फिशिंग हव
*8)* शिक्षण क्षेत्राला चालना, 100 नवीन सैनिक शाळा, 758 एकलव्य शाळा, उच्च शिक्षण आयोग
♟️ या अर्थसंकल्पावर विरोधकांनी आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की मोदी सरकारने आपली मालमत्ता आपल्या उन्मत्त भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची योजना आखली आहे.