‘आयपीएल’चे 14वे पर्व 11 एप्रिलपासून सुरू होणार..? - वाचा अधिक
Type Here to Get Search Results !

‘आयपीएल’चे 14वे पर्व 11 एप्रिलपासून सुरू होणार..? - वाचा अधिक

 


🏆 *‘आयपीएल’चे 14वे पर्व 11 एप्रिलपासून सुरू होणार..?*


🏏 इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 14वे पर्व 11 एप्रिलपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 'बीसीसीआय आणि आयपीएल’ प्रशासकीय समिती यांच्यात या मोसमातील ‘आयपीएल’च्या वेळापत्रकाविषयी एकमत झाले आहे.

💁🏻‍♂️ *मिळालेल्या माहितीनुसार..*

▪️ आयपीएल’ला 11 एप्रिलपासून सुरुवात होईल आणि अंतिम सामना 5 किंवा 6 जून रोजी खेळवला जाईल , अशी माहिती आहे. याविषयी आता अंतिम निर्णय ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. 

 

▪️ मात्र पर्यायी तारीख म्हणून 11 एप्रिलची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाची इंग्लंडविरुद्धची मालिका मार्च महिन्यात संपुष्टात येणार असून तोपर्यंत खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळू शकेल,’’ असेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले.


▪️ भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 28 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पुरेशी विश्रांती घेऊन सर्व खेळाडू आपापल्या संघात दाखल होतील. 


🗣️ *‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ म्हणाले..*


🏟️ ‘‘आयपीएल’चे 13वे पर्व कोरोनामुळे संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आले होते. यंदाची आयपीएल भारतातच खेळवण्यात येणार आहे. ‘बीसीसीआय’ला पुढील आयपीएलसाठी परदेशातील ठिकाणाची व्यवस्था करावी लागणार नाही,’’ असे ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमाळ यांनी  स्पष्ट केले होते.


🏟️ "सद्यस्थितीत अमिरातीपेक्षा भारत हे सुरक्षित ठिकाण आहे. कोरोनाबाबतच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा आहे. आयोजनासाठी अद्याप आमच्याकडे पुरेसा वेळ असल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येतील,’’ असेही धुमाळ म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section