स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवणारे 7 सुपरफूड
Type Here to Get Search Results !

स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवणारे 7 सुपरफूड

 


😎 *स्टॅमिना आणि ऊर्जा वाढवणारे 7 सुपरफूड-*

1️⃣ *केळी -* केळीमध्ये कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, नैसर्गिक साखर आणि स्टार्च देखील आढळते. ह्याचे सेवन केल्याने हे दिवसभर ऊर्जा देण्याचं काम करत आपण जिम जाण्यापूर्वी देखील हे घेऊ शकता.


2️⃣ *दही -* कॅल्शियम,आणि प्रथिनांनी समृद्ध दही आपल्या न्याहारीत समाविष्ट करावे. हे आपण फळे आणि इतर सुका मेवासह देखील खाऊ शकता. हे हाडे बळकट करून स्नायूंना देखील ऊर्जा देतं.


3️⃣ *सांजा -* हे आपल्या शरीराला त्वरित बूस्ट करण्याची क्षमता ठेवतं. सांजा आपण खिचडी आणि पुलाव सारखे देखील खाऊ शकतो. चवीत हे चांगले असते. सकाळी न्याहारीत खाल्ल्यावर बऱ्याच वेळा भूक लागत नाही आणि दिवसभर आपण ऊर्जेने समृद्ध राहाल. 


4️⃣ *अंडी -* हे लगेच बनतात आणि पोषक घटकाने समृद्ध असतात. हे हाडं आणि स्नायू दोन्ही बळकट करतात. यामध्ये अमिनो ऍसिड आढळते ज्यामुळे थकवा दूर होतो.


5️⃣ *पीनट बटर -* शेंगदाण्याने बनलेले हे बटर निरोगी अन्न प्रवर्गातील आहे. निरोगी फॅट आणि प्रथिन असल्यामुळे आपण हे मल्टिग्रेन ब्रेड बरोबर सकाळी खावे. हे खाल्ल्यावर बऱ्याच काळ ऊर्जेने भरलेले राहाल.


6️⃣ *बदाम -* हे देखील या श्रेणीत आहे हे हेल्थी फॅट पावरहाऊस सुकामेवाच्या रूपात न्याहारीत समाविष्ट करा. मेटॅबॉलिझम वाढविण्यात मदत करते तसेच स्टॅमिना वाढविण्यासाठी देखील हे कामी येत. रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खावं.


7️⃣ *ओट्स -* फायबर आणि कार्बोहायड्रेट ने समृद्ध ओट्स आळस दूर करतं. हे बऱ्याच काळ काम करण्यासाठी ऊर्जा देण्यात सक्षम आहे. जर आपण ओट्सचे सेवन कराल तर आळस आणि थकवा आपल्यापासून खूप लांब राहील.


(...✍🏻 सदर फूड्सचे फायदे हे तुमच्या पचनशक्तीवर अवलंबून आहेत, त्यांचे सेवन करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अगोदरच घ्या! )

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section