😳 PAN-Aadhar अजून लिंक केले नाही... तर जाणून घ्या PAN - Aadhaar लिंक करण्याची सोपी पद्धत!
👉 31 मार्च पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागानं म्हटलंय. आयकर सेवेचा लाभ मिळवण्यासाठी पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
👉 आधार कार्ड हे यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून (Income Tax Department) देण्यात येते.
📌 पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या दोन पद्धती आहे. ऑनलाइन आणि SMS द्वारे, आपण दोन्ही पद्धती पाहणार आहो.
🌀 *ऑनलाइन पॅन-आधार लिंक करण्याची पद्धत*
1️⃣ भारतीय आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा.
2️⃣ तिथे डाव्या बाजूस विविध पर्यायांची यादीत *'Link Aadhar'* या पर्यायावर क्लिक करा. किंवा खालील लिंक ओपन करा.
3️⃣ त्यानंतर पॅन कार्ड नंबर, आधार नंबर व आधार वरील नाव टाकून कॉप्च्या व्यवस्थित भरा.
4️⃣ नंतर 'Link Aadhar' वर क्लिक करा.
5️⃣ आधार आणि पॅन लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. पॅन-आधार लिंक होण्यास काही वेळ लागतो.
💬 *SMS द्वारे लिंक करण्याची पद्धत*
1️⃣ SMS मध्ये UIDPAN टाइप करा.
2️⃣ नंतर स्पेस देऊन आपला आधार नंबर आणि त्यानंतर पॅन नंबर टाइप करा.
3️⃣ UIDPAN<space><12-digit Aadhaar><space><10-digit PAN> या प्रकारे लिहून 567678 किंवा 56161 वर पाठवा.
4️⃣ यानंतर आयकर विभाग दोन्ही नंबर लिंक करण्याची प्रोसेस सुरु करेल.
📌 *आधार कार्ड - पॅन कार्ड लिंक झाले किंवा नाही कसे पहायचे ?*
1️⃣ आधार आणि पॅन कार्ड लिंक झाले की नाही पाहण्यासाठी खालील वेबसाइट ओपन करा.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html
2️⃣ त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर टाका
3️⃣ त्यानंतर 'View link Aadhaar Status' वर क्लिक करा .
4️⃣ आता तुम्हाला पॅनकार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही ते दिसेल
🙏 *ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा*
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -