काश्मीरच्या खोऱ्यात प्रथमच 15 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण होणार !
Type Here to Get Search Results !

काश्मीरच्या खोऱ्यात प्रथमच 15 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण होणार !


 🎬 काश्मीरच्या खोऱ्यात प्रथमच 15 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण होणार !

🎥 काश्मीरमध्ये बॉलीवूडने दमदार पुनरागमन केले आहे. मागील काही वर्षांत असे पहिल्यांदाच होत आहे की, खोऱ्यात एकाच वेळी 15  पेक्षा जास्त चित्रपट, वेब सिरीज, व्हिडिओ अल्बम, व्यावसायिक जाहिरातींचे चित्रीकरण सुरू आहे. 


🏔️ काश्मीरच्या खोऱ्यात होणार चित्रीकरण-

▪️ दल सरोवर, मुघल गार्डन, गुलमर्ग, पहलगामसारख्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. तसेच बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे अनेक निर्माते त्यांच्या चित्रपटांसाठी लोकेशन शोधण्यासाठी खोऱ्यात आहेत. 


▪️ काश्मीरच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर अजय देवगण फिल्म्स, संजय दत्त प्राॅडक्शन, रिलायन्स एंटरटेन्मेंट, रोहित शेट्टी फिल्म्स, झी स्टुडिओज, अधिकारी ब्रदर्स अँड एसएबी (मराठी), अँडमोल, राजकुमार हिराणी, एक्सेल एंटरटेन्मेंट तसेच प्रोड्युसर्स गिल्ड, मुंबईचे प्रतिनिधी गेले आहेत. 


▪️ गुलमर्गचे एक हॉटेल मालक वसित यांनी सांगितले की, "याआधी त्यांनी 2016 मध्ये काश्मीरच्या विविध भागात असे चित्रीकरण पाहिले होते. मात्र, या वेळचे चित्र जास्त मोठे आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा येथील पर्यटन उद्योगावर सकारात्मक प्रभाव होतो."

 

👷 *रोजगार निर्माण होणार-* 2015 मध्ये सलमान खानने ‘बजरंगी भाईजान’चे येथे चित्रीकरण सुरू केल्यानंतर हॉटेल कर्मचारी, वाहनचालक, घोडेवाले, दुकानदार, हस्तशिल्प विक्रेते अशा हजारो जणांना चित्रपटात लहान-मोठी भूमिका मिळाली. त्यांनी येथे 8-10 कोटी रुपये खर्च केले. त्या काळी संपूर्ण गुलमर्ग आणि पहलगाम 3 महिन्यांसाठी हाऊसफुल्ल झाले होते. 


🗣️ *जम्मू-काश्मीरच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉ. जी. एन. इतू सांगतात,*"हे निर्माते विविध ठिकाणी जातील. गाण्यांचे चित्रीकरण असेल किंवा व्यावसायिक जाहिरातींचे चित्रीकरण, बॉलीवूड आणि इतर लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रीकरणाची परवानगी विभागाच्या वतीने लगेच देण्यात येत आहे."

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section