☑️ अरे व्वा..! आता तुम्हीही पाहू शकता जवळील ब्लड बँकेतील सर्व माहिती; कसं ते घ्या जाणून!
☑️ उमंग अॅपवर आता e-RaktKosh उपलब्ध झालं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
☑️ यामुळे तुमच्या जवळच्या ब्लड बँकेतील रक्ताची उपलब्धता, विविध रक्तदान शिबिर व रक्तदानासाठी रजिस्टर करण्यासंदर्भातील माहिती उपलब्ध होणार आहे.
🟢 *उमंग अॅपवरुन ब्लड बँकेची माहिती अशी तपास -*
☑️ उमंग अॅपवर जाऊन सर्च बटणावर e-Rakt Kosh असे टाईप करा. नंतर e-Rakt Kosh पर्याय सिलेक्ट करा.
☑️ त्यानंतर 'Check Blood Availability option' ची निवड करा.
☑️ यानंतर तुम्ही हॉस्पिटलचे नाव, प्रत्येक ब्लड ग्रुपप्रमाणे युनिट्सची संख्या, ठिकाण, तारीख, संपर्क हे पाहू शकता.
☑️ दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना व्हायरस संकटकाळात 'safe blood' सहज उपलब्ध होण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. आता त्यात हा पर्याय उपलब्ध झाला आहे.