आजच्या चालू घडामोडी 27 जानेवारी 2021
Type Here to Get Search Results !

आजच्या चालू घडामोडी 27 जानेवारी 2021

 


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ 

📍 *चालू घडामोडी*📍

  *27 जानेवारी 2021*

⚡गेल्या 24 तासात देशात 9 हजार 102 नव्या रुग्णांच्या नोंदीसह 117 जणांचा मृत्यू झाला आहे.देशात कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 6 लाख 76 हजार 838 एवढी झाली आहे. 


😥गेल्या 24 तासात 117 जणांचा मृत्य झाल्याने आजवरची मृत्युसंख्या 1 लाख 53 हजार 587 झाली आहे. 


👉🏻आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 45 हजार 985 झाली आहे.


*👩🏻संयुक्त राष्ट्राच्या सल्लागार मंडळात जयती घोष*


🏷️संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूएन) वीस सदस्यीय उच्चस्तरीय सल्लागार मंडळात भारताच्या अर्थतज्ज्ञ जयती घोष यांचा समावेश झाला आहे.


🏷️कोरोनानंतर जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे मंडळ सल्ला देईल.


🏷️घोष यांनी ३५ वर्षे जवाहरलाल विद्यापीठात अर्थशास्त्राचे धडे दिले आहेत.


🏷️संयुक्त राष्ट्रसंघाच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेयरने (युएनडीइएसए) सल्लागार मंडळाच्या 20 सदस्यांची घोषणा केली आहे.


🏷️ यात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील 20 तज्ञांची नावे सामील आहेत. 


🏷️हे सल्लागार मंडळ पुढील दोन वर्षांपर्यंत नेतृत्व आणि वैचारिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाला बळकटी देणार आहे.


*💻 दिल्लीतील तणावग्रस्त भागात  इंटरनेट सेवा बंद*


🏷️दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली. 


🏷️दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. 


🏷️केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.


🏷️सिंघु, टिकरी आणि मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.


*✒️आजपासून 'पाचवी ते आठवी' च्या शाळा होणार सुरू*


🏷️राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून(27 जानेवारी) सुरू होणार आहेत. 


🏷️शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 


🏷️याआधी 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. 


🏷️तर, आजपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत.


*🔔संक्षिप्त घडामोडी* 


▪️ दिल्लीतील तणावग्रस्त भागात इंटरनेट सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश.


▪️ भारतातील एक हजारांपेक्षा अधिक बंधारे धोकादायक; संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून माहिती उघड.


▪️भारतामध्ये पुन्हा TikTok सुरु होण्याची आशा मालवली; केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर घातली कायमस्वरुपी बंदी.


▪️पाचवी ते आठवीपर्यंतचा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार करू : वर्षा गायकवाड


▪️घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद; नागरिकांच्या खिशाला शासनाची कात्री.


▪️सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश.

▪️▪️▪️▪️▪️▪️

👬 *हि माहिती मित्रांना पण शेअर करा*

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section