प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलक सज्ज; दोन लाख ट्रॅक्टरचा सहभाग
⚡ केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाचा भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर संचलनात दोन लाख ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत.
🚜 *रॅली पार्श्वभूमीवर तयारी* : शेतकरी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संचलनाला होणारी गर्दी पाहून वाहतूक नियंत्रक कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्यात येईल.
👉 दिल्लीच्या राजपथावरील संचलन दुपारी 12 वाजता संपेल व त्यानंतर ट्रॅक्टर संचलन सुरू होईल.
👉 कीर्ती किसान युनियनचे अध्यक्ष निर्भीसिंग धुदिके यांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी पंजाबमधून एक लाख ट्रॅक्टर दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत.
📍दरम्यान, या संचलनाच्या नियंत्रणासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ते या संचलनाच्या तयारीकडे लक्ष देत आहेत.
🔍 प्रमुख मागण्या कोणत्या ?
▪️शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा.
▪️शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा.
▪️वीज विधेयक मागे घ्या.
▪️कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा.
▪️वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा.
▪️ आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या.