प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील 946 पोलिसांना सोमवारी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.
त्यात राज्यातील 57 पोलिसांचा समावेश आहे . पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्पना गाडेकर, पोलीस निरीक्षक राजा बिडकर, अजय जोशी यांचा समावेश आहे. तर अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, डॉ. सुखविंदर सिंग, एसीपी तुकाराम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांना विशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षक पदक, सुधारात्मक पदकांची घोषणा केली. राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक, 13 पोलिसांना पोलीस शौर्य पदक तर 40 पोलिसांना पोलिस पदक जाहीर झाले आहे.