🎯 चालू घडामोडी :- 05 ऑक्टोबर 2023 👇
◆ पिअरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस,अँन ह्यूलियन या तीन शास्त्रज्ञाना 2023 वर्षाचा भौतिकशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
◆ भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या अँन ह्युलियन या पाचव्या महिला शास्त्रज्ञ आहेत.
◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा अमेरिका देशात उभारण्यात येत आहे.
◆ अमेरिकेत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठया पुतळ्याला "स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी" नावाने ओळखले जाणार आहे.
◆ भारतातबाहेरील अमेरिकेत होणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा 19 फूट उंच असणार आहे.
◆ अमेरिकेतील मेरिलँड शहरात भारताबाहेरील सर्वात मोठया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
◆ द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग च्या अहवलानुसार जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान "ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी" मिळाला आहे.
◆ जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या 8 युनिव्हर्सिटी पैकी 6 युनिव्हर्सिटी अमेरिका देशातील आहेत.
◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे.
◆ भारताने इंटरनेट स्पीड च्या रँकिंग मध्ये 119 व्या स्थानावरून 47व्या स्थानावर झेप घेतली आहे.
◆ इराणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद "शेष भारत" संघानी जिंकले आहे.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणी हिने भालाफेक खेळात सुवर्णपदक जिंकले आहे.
◆ भारताच्या अन्नू राणी ने आशियाई क्रीडा स्पर्धेत 62.92 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत पारुल चौधरी ने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णं पदक जिंकले आहे.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पारुल चौधरी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
◆ भारताच्या मोहम्मद अफसल ने आशियाई क्रीडा स्पर्धेत 8 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे.
◆ भारतातील "वाघ बकरी चहा" उद्योग समूहाला मोस्ट एंड्युरिंग ब्रँड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━