💁♀️ आधार कार्डधारकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. UIDAI ने आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जून 2023 निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ती 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
📄 अशातच आता पुन्हा एकदा UIDAI ने ही सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून फ्री अपडेट करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी आधार कार्ड अपडेट्स करण्याची तारीख वाढवण्याची विनंती केल्याने सरकारने मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना myAadhaar वेबसाईटवर आधार दस्तावेजांच्या आधारे मोफत अपडेट करता येईल.
👉 असे करा आधार कार्ड अपडेट :
▪️ सर्वात प्रथम UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.
▪️ त्यानंतर 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
▪️ पुढे ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा.
▪️ आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल.
▪️ ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा.
▪️ ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा.
▪️ त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट्स होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
ही माहिती आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा..👍
आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा..