2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
Type Here to Get Search Results !

2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

 2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 7 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

फोटो स्रोत,GETTY IMAGES

नोटबंदीच्या काळात आणलेली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे.

सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे.

1. दोन हजारांच्या नोटा मागे का घेण्यात येत आहेत?

2000 रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणल्या होत्या. RBI कायदा 1934 अंतर्गत कलम 24(1) अन्वये या नोटा चलनात आल्या.

त्यावेळी भारत सरकारने रुपये 500 आणि 1000 मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याची भरपाई काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही सोय केली होती.

तात्पुरत्या वापरानंतर या नोटा 2018-19 साली छापणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं. मार्च 2017 सालीच या नोटांचा वापर येत्या चार-वर्षांपुरताच करण्यात येईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले होते.

तेव्हापासूनच बाजारात या नोटा दिसणं कमी झालं होतं. दरम्यान, नोटाबंदीनंतर इतर मूल्यांच्या अनेक नोटा बाजारात दाखल झाल्या.

अखेरीस, रिझर्व्ह बँकेच्या क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 12 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

2. क्लिन नोट पॉलिसी काय आहे?

रिझर्व्ह बँकेकडून क्लिन नोट पॉलिसी हे धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. यानुसार लोकांच्या वापरासाठी बाजारात चांगल्या दर्जाच्या नोटांचा पुरवठा होईल, याची दक्षता रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाते

3. दोन हजारांच्या नोटा बाजारात यापुढेही वापरता येऊ शकतात का?

होय. 2000 रुपयांच्या नोटा यापुढेही लीगल टेंडर राहतील, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

म्हणजे, तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असल्यास यापुढेही त्या नक्की वापरता येतील. या नोटेचा वापर करून तुम्ही तुमचे व्यवहार अजूनही पूर्वीप्रमाणे करू शकता.  पण रिझर्व्ह बँकेने त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिलेली आहे. या मुदतीपर्यंत या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा घ्याव्यात, असा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आला आहे.

म्हणजे, तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असल्यास यापुढेही त्या नक्की वापरता येतील. या नोटेचा वापर करून तुम्ही तुमचे व्यवहार अजूनही पूर्वीप्रमाणे करू शकता.

पण रिझर्व्ह बँकेने त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिलेली आहे. या मुदतीपर्यंत या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा घ्याव्यात, असा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आला आहे.

2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

फोटो स्रोत,GETTY IMAGES

4. तुमच्याकडे 2000 च्या नोटा असल्यास काय कराल?

वर उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बिनदिक्कत वापरू शकता. पण तुम्हाला त्या बदलायच्या असतील, तर जवळच्या बँकांमध्ये जाऊन त्या जमा करा. त्या बदल्यात तुम्हाला इतर नोटा दिल्या जातील.

किंवा तुम्ही ते पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.

रिझर्व्ह बँकेने त्यांच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्येही 2000 च्या नोटांच्या बदल्यात इतर नोटा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

5. नोटा बँक खात्यात भरण्यासाठी रकमेची मर्यादा आहे का?

KYC (Know your Customer) च्या नियमांप्रमाणे कोणत्याही मर्यादेशिवाय तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यात जमा करता येतील.

KYC नसल्यास त्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले नियम सर्वांनाच लागू असतील.

यादरम्यान, नोटा बदलून घेणाऱ्या व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपये इतर नोटांच्या स्वरुपात बदलून घेता येतील.

6. नोटा बदलून घेण्याची सुविधा कधीपासून कधीपर्यंत उपलब्ध असेल?

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन विचारणा करू शकता.

2000 ची नोट कशी परत कराल? वाचा 12 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

नोटा बदलून देण्याची सुविधा देण्याकरिता बँकांना पुरेसा वेळ दिला जाणार आहे. त्यानुसार मे 2023 च्या अखेरपर्यंत या सुविधा सर्वत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या तरी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घ्याव्यात अशी सूचना केलेली आहे.

7. नोटा केवळ आपलं खातं असलेल्या बँकेतूनच बदलून मिळतील का?

नाही. वरील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात.

पण, बँकेत खातं नसलेल्या व्यक्तीकरिता नोटा बदलून घेण्यासाठी 20 हजार रुपयांची मर्यादा असेल.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section