प्रभसिमरन सिंगचं तडाखेबंद शतक
Type Here to Get Search Results !

प्रभसिमरन सिंगचं तडाखेबंद शतक


 धावांच्या राशी आणि शतकांचे रतीब यामध्ये प्रभसिमरन सिंग या भारतीय खेळाडूने दमदार भर घातली. पंजाब किंग्जतर्फे खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना खणखणीत शतकाची नोंद केली. प्रभसिमरनचं आयपीएल स्पर्धेतलं हे पहिलंच शतक आहे.

पंजाब किंग्ज आणि पूर्वीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे शतक झळकावणारा प्रभसिमरन बारावा फलंदाज ठरला आहे. याआधी शॉन मार्श, माहेला जयवर्धने, पॉल वल्थाटी, अडम गिलख्रिस्ट, डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, हशीम अमला, ख्रिस गेल, के.एल.राहुल, मयांक अगरवाल यांनी शतकी खेळी केल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत शतक झळकावताना भारतासाठी न खेळलेल्या मोजक्या खेळाडूंमध्येही प्रभसिमनरचा समावेश झाला आहे. मनीष पांडे, पॉल वल्थाटी, देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल या यादीत आता प्रभसिमरने स्थान पटकावलं आहे.

प्रभसिमरनचं हे स्पर्धेतलं पाचवं वर्ष आहे. सगळी वर्ष प्रभसिमरन पंजाब किंग्ज संघाचाच भाग आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section