28 Jan 2023
नमिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार 100 चित्ते:
नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम,जनकपूरवरून येणार धनुष्य:
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा :
- कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज 1 Feb मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून अंगिकारण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही.
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले आहे.
- हे राज्यगीत 1.41 मिनिट अवधीचे आहे.
आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम:
- विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल.
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे.
- मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टनम येथे स्थलांतरित केली जाणार आहे.
- आंध्र प्रदेश सरकारने 23 एप्रिल 2015 रोजी अमरावती शहर आपली राजधानी म्हणून घोषित केलं होतं.
- 2020 मध्ये राज्य सरकारने तीन शहरं राजधानी म्हणून बनवण्याची योजना आणली होती.
- ज्यामध्ये अमरावती, विशाखापट्टनम आणि कुरनूल या शहरांचा समावेश होता.
निर्मला सीतारामन यांच्या नावे अर्थसंकल्प सादर करण्याचा नवा विक्रम:
- निर्मला सीतारामन या आपल्या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत ज्यांच्या नावे सलग पाचवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे.
- मोदी सरकार 2.0 आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.
- माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम , यशवंत सिन्हा, मनमोहन सिंह आणि मोरारजी देसाई यांच्या यादीत आता सहावं नाव हे निर्मला सीतारामन यांचं असणार आहे.
- आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे.
- 1962 ते 1969 या कालावधीत त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प सादर केला.
- त्यानंतर पी. चिदंबरम यांच्या नावे नऊवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
- तर प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांच्या नावे 8 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.
मुकेश अंबानी बनले जगातील सर्वात श्रीमंत भारतीय:
- भारताचे दिग्गज उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत.
- फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानींनी गौतम अदाणींना एकूण संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
- फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे 84.3 बिलियन डॉलर्स एकूण संपत्तीसह नवव्या क्रमांकावर पोहचले आहेत.
- तर 84.1 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदाणी दहाव्या स्थानावर आले आहेत.
- फोर्ब्सच्या रिअर टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार बर्नाड अरनॉल्ट आणि कुटुंब टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत अव्वलस्थानी आहेत.
- दुसऱ्या क्रमांकावर इलॉन मस्क, तिसऱ्या स्थानी जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या स्थानी बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि कुटुंब, आठव्या क्रमांकावर लॅरी पेज, यानंतर नवव्या स्थानी मुकेश अंबानी, त्यांच्यानंतर गौतम अदाणी यांचा क्रमांक अजून घसरत आहे..
अमेरिकेकडून भारताला मिळणार लवकरच ‘हे’ शस्त्र :
- गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये लष्करापासून ते पोलीस विभागापर्यंत ड्रोनचा वापर केला आहेत.
- विशेषतः काही प्रमुख देशांचा भर हा लष्करी वापरासाठी तेही सशस्त्र ड्रोनच्या वापरावर राहिला आहे.
- अमेरिकेसारख्या देशामध्ये तर लढाऊ विमानांप्रमाणे ड्रोनची स्वतंत्र स्कॉड्रन आहेत.
- भारत अमेरिकेकडून गेली काही वर्षे ड्रोन घेण्याबाबत चर्चा करत आहे.
- तेव्हा दोन MQ-9 Reaper हे ड्रोन अमेरिकने प्रायोगिक वापर करायला भारतीय नौदलाकडे सूपुर्त केली आहेत.
- भाडे तत्तावर त्याचा सध्या वापर करत असून लवकरच हे ड्रोन अमेरिकेला परत केले जाणार आहे.
- मात्र गेल्या काही दिवसांतील चर्चेनंतर MQ-9B predator हे सशस्त्र ड्रोन अमेरिकेकडून घेण्याबाबत आता शिक्कामोर्तब झालं आहे.
- अशी एकूण 30 ड्रोन भारत घेणार आहे. लष्कर,नौदल आणि वायू दल यांना प्रत्येकी 10 ड्रोन देण्याचे नियोजन आहे.
- जमीन आणि हवेतील लक्ष्यावर नजर ठेवत सलग 14 तास टेहेळणी करत उड्डाण करण्याची क्षमता हे या ड्रोनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
- तसंच एका दमात 1800 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार करण्याची क्षमात यामध्ये आहे.
- हवेतून हवेत मारा करु शकणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब टाकण्यााची क्षमता या ड्रोनमध्ये आहे.
- तसंच जास्तीत जास्त 480 किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेत संचार करण्याचे कौशल्य या ड्रोनमध्ये असल्याने MQ-9B predator हे सध्याच्या काळातील सर्वात घातक ड्रोन समजले जाते.
नळाद्वारे पाणी पुरवठय़ात महाराष्ट्र देशात 13 व्या क्रमांकावर:
- ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘जल जीवन मिशन’ या योजनेवर केंद्र व राज्य सरकारचे शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही महाराष्ट्रात डिसेंबर 2022 अखेपर्यंत 72.27 टक्के ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करता आला.
- संपूर्ण देशात महाराष्ट्र या योजनेत तेराव्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय पाणीपुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
- ऑगस्ट 2019 पासून केंद्र सरकारने ‘जल जीवन मिशन’ ही योजना हाती घेतली.
- 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या लवकरच नियुक्त्या:
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाच न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यासाठी केलेली शिफारस लवकरच मंजूर केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिले.
- न्यायमूर्ती एस. के. कौल व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पीठाला महाधिवक्ता आर. वेंकटरामाणी यांनी या पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीचे लेखी आदेश लवकरच निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
- न्यायवृंदाने गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीची शिफारस केली होती.
- यामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंकज मित्तल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.
- नंतर 31 जानेवारी रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायवृंदाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल व गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या नावाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तीपदी बढतीसाठी केंद्राकडे शिफारस केली.
- सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायमूर्तीची मंजूर संख्या आहे.
- सध्या सर्वोच्च न्यायालयात 27 न्यायमूर्ती कार्यरत आहेत.
- वरील पाच न्यायमूर्ती पुढच्या आठवडय़ात शपथ ग्रहण करतील.
- त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या 32 होईल.
अग्निवीर’साठी आता प्रवेश परीक्षा भरती प्रक्रियेत बदल:
- लष्कराने ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत.
- त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल.
- यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
- आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे.
- मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल.