राज्यात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; "असा" करा अर्ज
Type Here to Get Search Results !

राज्यात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; "असा" करा अर्ज

Top Post Ad

 


👮🏻‍♂️ *राज्यात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; "असा" करा अर्ज..*


💁🏻‍♂️ महाराष्ट्रात २०२२ आणि २०२१ मधील तब्बल १४ हजार ९५६ रिक्तपदांची भरती पोलीस विभागात करण्यात येणार असून पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. 

➖➖➖➖➖➖

📣 _*आता तुमच्या मित्रांना सुद्धा मिळेल WhatsApp वर ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी 9021445353 हा नंबर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करा..*_

➖➖➖➖➖➖

🎯 ही भरती ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याबाबतची माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहे.


📃 *अटी व नियम* 


● उमेदवाराला पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

● अर्ज सादर करण्याचा कालावधी : ३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२

● कोणताही उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाहीत.

● उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.


📝 *परीक्षा पद्धती* 


अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १००% पैकी ४०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.


❓ *कुठे किती जागा ?* 


मुंबई - 6740, ठाणे शहर - 521, पुणे शहर - 720, पिंपरी चिंचवड - 216, मिरा भाईंदर - 986, नागपूर शहर - 308, नवी मुंबई - 204, अमरावती शहर - 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई - 620, ठाणे ग्रामीण - 68, रायगड -272, पालघर - 211, सिंधूदुर्ग - 99 रत्नागिरी - 131, नाशिक ग्रामीण - 454, अहमदनगर - 129, धुळे - 42, कोल्हापूर - 24, पुणे ग्रामीण - 579, सातारा - 145, सोलापूर ग्रामीण - 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड - 155, परभणी - 75, हिंगोली - 21, नागपूर ग्रामीण - 132, भंडारा - 61, चंद्रपूर - 194, वर्धा - 90, गडचिरोली - 348, गोंदिया - 172, अमरावती ग्रामीण - 156, अकोला - 327, बुलढाणा - 51, यवतमाळ - 244, लोहमार्ग पुणे - 124, लोहमार्ग, औरंगाबाद -154=एकूण - 14956


❓ *कोणत्या प्रवर्गाला किती जागा?* 


अनुसूचित जाती - 1811, अनुसूचित जमाती - 1350, विमुक्त जाती (अ) - 426, भटक्या जमाती (ब) - 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) - 292, विमुक्त मागास प्रवर्ग - 292, इतर मागास वर्ग - 2926, इडब्लूएस - 1544, खुला - 5468 जागा =एकूण - 14956


● *Join Telegram* 

👉🏻 https://t.me/Pawan_academy

Below Post Ad