नौदलासाठी प्रथमच खासगी कंपनीचा दारूगोळा :
- भारतीय संरक्षण दलासाठी स्वदेशी बनावटीच्या शस्त्रनिर्मितीवर भर देऊन या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रक्रियेनुसार भारतीय नौदल प्रथमच एका खासगी कंपनीद्वारे निर्मित दारूगोळा (स्फोटक) वापरण्यास सज्ज झाले आहे.
- हा दारूगोळा नागपूर येथील एका खासगी कंपनीने बनवला आहे.
- भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत शुक्रवारी दाखल झाली.
- यासोबतच नौदलासाठी 100 टक्के स्वदेशी स्फोटके देखील तयार झाली आहेत.
- खासगी कंपनीने याची पहिली खेप नौदलाच्या सुपूर्द देखील केली आहे.
- नागपूर येथील सोलार ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिडेटने तोफेसाठी वापरली जाणारी ही 30 मिमी उच्च स्फोटके तयार केली आहेत.
Must Read (नक्की वाचा):
छत्रपती शिवाजी महाराज नौदलाच्या नव्या ध्वजाचे प्रेरणास्थान :
- संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरणाद्वारे राष्ट्रार्पण करण्यात आले.
- यामुळे अशा युद्धनौका निर्मितीची क्षमता असलेल्या मोजक्या राष्ट्रांत भारताचा समावेश झाला आहे.
- या निमित्ताने मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या नव्या चिन्हांकित नौदल ध्वजाचे अनावरणही केले.
- कोचीच्या ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’मध्ये (सीएसएल) हा सोहळा झाला.
- 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी नौदलाची पूर्वीची युद्धनौका ‘विक्रांत’ हिचे नाव या नव्या युद्धनौकेस देण्यात आले आहे.
- विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. एकाच वेळी 30 पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे.
- विक्रांतचे वजन हे तब्बल 40 हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन 45 हजार टन एवढे असते. एका दमात 15 हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे.
- तब्बल 1400 पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात.
- हवेतील 100 किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-8 ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत.
- तब्बल 262 मीटर लांब आणि 14 मजली उंच अशा या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.
भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची ‘स्टारबक्स’च्या ‘सीईओ’पदी निवड :
- दिग्गज कॉफी ब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टारबक्सने गुरुवारी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
- ते आता हॉवर्ड शुल्त्झ यांची जागा घेतील.
- नरसिंहन 1 ऑक्टोबर रोजी कंपनीत रुजू होणार आहेत, तर शुल्त्झ हे एप्रिल 2023 पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील, त्यानंतर ते स्टारबक्स संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहतील.
- नरसिंहन हे जगातील सर्वात मोठ्या कॉफी चेन कंपनीत सीईओ म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळतील.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे :
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) ला खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला आहे.
- 85 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांचा पराभव केला.
- पूर्व बंगालचा माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी 33 -1 अशा फरकाने विजय नोंदवत भुतिया यांचा पराभव केला.
दिनविशेष :
- सन 1752 मध्ये अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
- श्रीमती अॅनी बेझंट यांनी 3 सप्टेंबर 1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना केली.
- महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
- लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 मध्ये झाला.
- सन 1971 मध्ये कतारला स्वातंत्र्य मिळाले.