चालू घडामोडी आणि दिनविशेष (2 सप्टेंबर 2022)
Type Here to Get Search Results !

चालू घडामोडी आणि दिनविशेष (2 सप्टेंबर 2022)

 जो बायडन यांच्या सल्लागार परिषदेमध्ये दोन भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश :

  • अमेरिकेच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा सल्लागार परिषदेवर (NIAC) दोन भारतीय वंशांच्या नागरिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही घोषणा केली आहे. मनू अस्थाना आणि मधू बेरिवाल अशी या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत.
  • देशातील पायाभूत क्षेत्राची सुरक्षा आणि संभावित सायबर धोक्यापासून बचावासाठी या परिषदेकडून व्हाईट हाऊसला मार्गदर्शन करण्यात येते.
  • या परिषदेसाठी बँकिंग, वित्त, वाहतूक, ऊर्जा, पाणी, धरणे, संरक्षण, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, अन्न आणि कृषी, सरकारी सुविधा यासह विविध क्षेत्रातील सखोल अनुभव असलेल्या 26 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं या परिषदेसाठी घोषित करण्यात आली आहेत.
  • मनू अस्थाना उत्तर अमेरिकेतील जगातील सर्वात मोठ्या पॉवर ग्रीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पीजेएमचे(PJM)अध्यक्ष आहेत.
  • सल्लागार परिषदेवरील भारतीय वंशांच्या मधू बेरिवाल यांनी 1985 साली ‘इनोव्हेटिव्ह इमॅरजन्सी मॅनेजमेंट’(IEM)या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत.

रोहित शर्माने हाँगकाँग विरुद्ध विजयानंतर रचला ‘हा’ विक्रम :

  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्धच्या विजयानंतर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
  • या यादीत विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा आता टॉपला पोहचला आहे.
  • भारत विरुद्ध हाँगकाँग हा रोहित शर्माच्या टी- 20 कारकिर्दीत कर्णधार म्हणून खेळलेला 37 वा सामना होता.
  • हाँगकाँग विरुद्ध विजयानंतर शर्माच्या नावे 31 विजय नोंदवले गेले आहेत.
  • भारताचा कर्णधार म्हणून कोहलीने 50 सामन्यांतून 30 विजय मिळवले आहेत.
  • यशस्वी कर्णधारांच्या यादीत या क्षणी महेंद्रसिंग धोनी अव्व्ल आहे, ज्याने 72 सामन्यांतून आपल्या नेतृत्वाखाली भारताला 41 टी- 20 सामने जिंकण्यास मदत केली आहे.

दिनविशेष :

  • 2 सप्टेंबर 1916 मध्ये पटणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन 2 सप्टेंबर 1920 मध्ये झाले.
  • व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून 2 सप्टेंबर 1945 मध्ये स्वतंत्र झाला.
  • 2 सप्टेंबर 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक 2 सप्टेंबर 1960 मध्ये झाली.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section