📝नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने सीयूईटी २०२२ साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली असून, आता उमेदवार २२ मेपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे होती. अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी अर्जदारांना २५ मे ते ३१ मेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. एनटीएने cuet.samart.ac.in या वेबसाइटवर याबाबत नोटीस जारी केली आहे.
✒️यंदा बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजी प्रवेशासाठी विद्यार्थी सामायिक विद्यापीठ (कॉमन युनिव्हर्सिटी) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम,ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये होईल.
👉🏻 असा करा अर्ज
cuet.samarth.ac.in ला भेट द्या.
अर्ज लिंकवर क्लिक करा.
स्वतःची नोंदणी करा.
सर्व आवश्यक माहिती भरा.
अर्ज फी सबमिट करा.
अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.