● लालपरी आता नव्या रूपात; एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' उद्या १ जूनपासून धावणार; लोकार्पण सोहळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार
● पौष्टिक तृणधान्ये राज्यातून नामशेष होण्याची भीती; लागवड क्षेत्रात वेगाने घट, मूल्यवर्धनासाठी कृषी विभागाचा पुढाकार
● परदेशी शिष्यवृत्तीत महाराष्ट्र पिछाडीवर; इतर राज्यांत तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; महाराष्ट्रातून दरवर्षी अनुसूचित जातीच्या ७५ तर इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जमातीमधील केवळ १० विद्यार्थ्यांना विदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो
● पश्चिम विदर्भात चार महिन्यांमध्ये ३४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; सरकारी मदतही अपुरी; २००१ पासून २०२२ या दोन दशकांमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ५ हजार २०३ आत्महत्यांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली
● एकसमान पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी विचारात घ्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश; राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठांच्या कुलगुरुंसह २५ एप्रिलला परीक्षांच्या नियोजनाबाबत बैठक झाली होती
● मुंबई पालिका शाळांना पालकांची पसंती, ३५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश; पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय होता
● राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी; धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही, मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा आला धमकीचा फोन
● जन्मदात्या आईने सहा मुलांना विहीरीत ढकलले; महाडच्या ढालकाठी येथील घटना; मुलांचा मृत्यू तर आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला बचावली
● अपक्ष व छोट्या पक्षांच्या २९ मतांवर ‘डोळा’; मतांची फाटाफूट रोखण्याचे आव्हान, भाजपच्या खेळीने महाविकास आघाडीत अस्वस्थता; राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत
▪️ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
▪️ यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या 'अकांक्षा'चा झेंडा, यूपीएससीच्या निकालात तिला 562 व्या रँकने उत्तीर्ण
▪️ १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना २९ वर्षानंतर पकडले गेले, चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायायलीन कोठडी
▪️ भरदिवसा बंदुकधारी गुंडांची माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात घुसखोरी, नांदेडमधील धक्कादायक प्रकार
▪️ लहान भावाच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या बहिणीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन, परभणीच्या पूर्णेतील घटना
▪️ शेतकऱ्यांना जादा मिळू लागल्याचे सध्याच्या केंद्र सरकारला पाहवत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा आरोप
▪️ लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाचा टेम्पो उलटला; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, नाशिकच्या सिन्नरजवळ टेंभुरवाडीतील घटना
▪️ दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक, एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप
▪️ अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार; अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक भरता येणार आहे
▪️ ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना विजेच्या वाहनांबाबत प्रशिक्षणच नाही; नव्या तंत्रज्ञानाबाबत अनेकजण अनभिज्ञ; विजेवर धावणाऱ्या आधुनिक वाहनांची तांत्रिक माहिती अधिकाऱ्यांना असणे आवश्यक