अरे भाऊ, सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो रे..!
Type Here to Get Search Results !

अरे भाऊ, सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो रे..!


अरे भाऊ, सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला का असतो रे..!

फोन वापरण्यासाठी दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असणे गरजेचे आहे, ते म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि सिम कार्ड. सिम कार्ड नसेल तर तुम्ही फोनवरून अनेक कामे करू शकत नाही. सिम कार्डमुळे प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा फोन नंबर तर असतोच, मात्र यामुळे हँडसेटच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधणे देखील सोपे जाते. शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व गोष्टी स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत. मात्र, या सर्व सेवांचा उपयोग करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड (Sim Card) असणे अत्यंत गरजेचे आहे. सिम कार्ड असल्यास तुम्ही फोनमध्ये इंटरनेट वापरू शकता. देशातील काही प्रमुख टेलिकॉम कंपन्या सिम कार्डच्या माध्यमातून यूजर्सला सेवा पुरवत असतात. तुम्ही अनेकदा सिम कार्डला फोनमध्ये इन्सर्ट केले असेल. मात्र, कधी विचार केला आहे का की सिम कार्डचा एक कोपरा कट केलेला अर्थात कापलेला का असतो? याविषयी जाणून घेऊया.

सुरुवातीच्या काळात सिम कार्डमध्ये कट केलेले डिझाइन नव्हते. मोबाइल फोनसाठी जेव्हा सिम कार्डचा उपयोग सुरू झाला, त्यावेळी याचे डिझाइन खूपच साधे होते. याला कोणत्याही प्रकारे कट केलेले नव्हते. यामुळे अनेकदा लोकांना सिम कार्ड मोबाइलमध्ये टाकण्यास व काढताना समस्या येत असे. तसेच, सिम कार्डचा कोणता भाग उलटा आहे व कोणता भाग सरळ आहे, हे देखील अनेकदा लक्षात येत नसे. टेलिकॉम कंपन्यांच्या ही समस्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिम कार्डच्या डिझाइनिंगमध्ये काही बदल केले.

टेलिकॉम कंपन्यांनी सिम कार्डच्या डिझाइनमध्ये केलेल्या बदलामुळेच आपल्याला याचा एक कोपरा कापलेला दिसतो. सिम कार्डचा एक कोपरा कापलेला असल्याने लोकांना मोबाइलमध्ये सिम कार्ड लावणे खूपच सोपे झाले. यामुळेच इतर कंपन्यांनी देखील कोपरा कापलेला असलेले सिम कार्ड जारी करण्यास सुरुवात केली. सध्या स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड ट्रे च्या डिझाइनमध्ये देखील एका बाजूला कोपरा कापलेले डिझाइन दिसून येते. जेणेकरून, यूजर्सला सिम कार्ड इंस्टॉल करताना कोणतीही समस्या येणार नाही. दरम्यान, अनेक स्मार्टफोनमध्ये आता ई-सिम सपोर्ट मिळताना दिसत आहे. त्यामुळे सिम कार्ड स्लॉटची समस्याच समाप्त होईल..

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section