Pawan Digital | FastNews
● राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी अॅड.गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, गिरगाव कोर्टाचा निर्णय
● भाजप नेते किरीट सोमय्यांना कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, तर मुलगा नील सोमय्या यांच्या अर्जावर उद्या होणार सुनावणी
● मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीनंतर आपण 100 टक्के समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली
● दुधाला रास्त भावाची हमी मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक, या मागण्यांसाठी देश पातळीवर आंदोलन होणार, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांची माहिती
● शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करु नका, विषय इगोवर घेऊ नका, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचं आपल्या वक्तव्यावरुन झालेल्या वादावर भाष्य
● ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार?, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात दुसरा टीझरही जारी
● मुंबईच्या मानखुर्दमध्ये दोन गटांत राडा, या राड्याप्रकरणी 7 जणांना पोलिसांकडून अटक, परिसरात तणावपूर्ण शांतता
● पुणे नगर महामार्गावर अपघात, मोटार आणि बसच्या धडकेत एक ठार, २५ प्रवासी जखमी, र तीन वाहने आणि हॉटेलचेही मोठे नुकसान
● झारखंडमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात, अनेक पर्यटक अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू
● पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड, शाहबाज शरीफ रात्री पंतप्रधानपदाची शपथ घेणार