👌 व्हॉट्सॲपचं नवं फिचर ! आता मेसेज एकदा पाहिल्यावर लगेच गायब होणार
💬 जगभरात सर्वाधिक युझर्स असलेले व्हॉट्सॲप हे इस्टंट मेसेजिंग ॲप नेहमीच युझर्ससाठी नवीन फिचर्स आणत असते. यावेळी व्हॉट्सॲपने युझर्ससाठी नवीन फिचर लाँच केले आहे. यावेळी व्हॉट्सॲपने 'व्ह्यू वन्स' हे नवे फिचर सर्व बीटा युझर्ससाठी लाँच केले आहे.
🧐 *व्हॉट्सॲपचं हे फिचर कसं काम करेल ?*
▪️ WABetainfo च्या रिपोर्टनुसार, या नव्या फिचरमुळे व्हॉट्सॲपवर आलेले मेसेज वाचल्यानंतर ते लगेच गायब होणार आहेत. मेसेज व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज एकदा वाचल्यानंतर तो पुन्हा वाचता येणार नाही, असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे
▪️ 'View Once Mode' मध्ये फोटो व्हिडिओ सेंड करताना व्हॉट्सॲप युझर्सला पहिल्यांदा मीडिया सिलेक्ट करावी लागेल आणि त्यानंतर 'वॉच' या आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
▪️ तिथे Add a caption असा पर्याय दिसेल. यानंतर कोणताही व्हिडिओ किंवा फोटो शेअर केल्यानंतर इतर व्यक्तींना तुमचे व्हिडिओ फोटो एकदाच पाहता येणार आहे.
▪️ जेव्हा तुम्ही view once चा वापर करुन फोटोज आणि व्हिडिओज पाठवाल ते केवळ एकदाच पाहता येतील आणि समोरच्या व्यक्तीने फोटो किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला येईल.
▪️ read receipts म्हणजेच ब्लु टिक डिसेबल केले असेल तर view once सेट करुन पाठवलेले फोटोज किंवा व्हिडिओज समोरील व्यक्तीने पाहिले की नाही, हे तुम्हाला कळणार नाही.
📍 फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी याविषयी माहिती दिली आहे. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपचे हे फिचर सर्व बीटा युझर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. WABetainfo ने याविषयी ट्विटरवर माहीती दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖