अर्थमंत्र्यांकडून अर्थव्यवस्था व आरोग्यव्यवस्थेसाठी नव्या घोषणा
📈 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध घोषणा केलेल्या आहेत.
1) ECLGS फंडिंगची मर्यादा वाढवून 4.5 लाख कोटी रुपये : ECLGS (Emergency Credit Line Guarantee Scheme) फंडिंगची मर्यादा केंद्र सरकारने वाढवण्याची घोषणा केलीय. त्यामध्ये ECLGS फंडिंगची मर्यादा वाढवून 4.5 लाख कोटी रुपये करण्यात आली.
२) कोविडने प्रभावित क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम : कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी 50 हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी 60 हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल.
3) 5 लाख परदेशी पर्यटकांकडून विजा शुल्क नाही : भारतात परदेशी प्रवाशांना येण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्या 5 लाख परदेशी पर्यटकांना विजा शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. ही सूट 31 मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे.
4) 25 लाख जणांना MFI च्या माध्यमातून 1.25 लाखपर्यंतचं कर्ज : मायक्रो फायनान्स इंस्टिट्यूशन्सच्या (MFI) मदतीसाठी 25 लाख जणांना क्रेडिट गॅरंटी स्कीमची घोषणा करण्यात आली. हे कर्ज MCLR+2 टक्के दराने मिळेल. कर्जाचा कालावधी 3 वर्षे असेल. जास्तीत जास्त कर्ज घेण्याची मर्यादा 1.25 लाख रुपये असेल. यासाठी 7,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेचा लाभ 31 मार्च 2022 पर्यंत घेता येईल.
5) 11 हजार नोंदणीकृत टुरिस्ट गाईडसाठी नवी योजना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 11 हजार नोंदणीकृत टुरिस्ट गाईडसाठी नवी घोषणा करण्यात आलीय. या योजनेत नोंदणीकृत संस्थांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची गॅरंटी देण्यात येणार आहे.
6) रजिस्टर्ड गाईडला 100 टक्के गॅरंटीचं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज
7) आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मुदतवाढ : सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 रोजी लाँच करण्यात आली होती. ही योजना आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. या योजनेत सरकारने 22 हजार 810 कोटी रुपये गुंतवणूक केलीय.
8) DAP आणि P&K फर्टिलायजरसाठी (खते) अतिरिक्त अनुदानाची (सब्सिडी) घोषणा : DAP आणि P&K फर्टिलायजरसाठी (खते) अतिरिक्त अनुदानाची (सब्सिडी) घोषणा करण्यात आलीय.
आता मिळवा सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट फक्त एका क्लिक वर
🚨 जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा व मित्रांनाही रेफर करा.
👉 https://cutt.ly/qn8OfAo