जागतिक कमाॅडिटी बाजरात कच्च्या तेलाच्या किंमती ७० डॉलरवर गेल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांवर दबाव वाढला आहे. कंपन्यांकडून एकदिवसआड इंधन दरवाढ केली जात आहे.

हायलाइट्स:
- आज शुक्रवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवला.
- देशभरात आज पेट्रोल २९ पैसे आणि डिझेलमध्ये २८ पैशांची वाढ झाली.
- राजस्थानातील श्री गंगानगर येथे डिझेलचा भाव ९९.८० रुपये झाला आहे.
आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०२.०४ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.८५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९७.१९ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९५.८० रुपये आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव १०१.६४ रुपये झाला आहे. बंगळुरूत ९९.०५ रुपये झाले आहे.
आज मुंबईत डिझेलचा भाव ९४.१५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८६.७५ रुपये आहे. चेन्नईत ९१.४२ रुपये आणि कोलकात्यात ८९.६० रुपये डिझेलचा भाव आहे. पुण्यात डिझेलचा भाव ९२.३२ रुपये आहे. तर बंगळुरूत डिझेल ९१.९७ रुपये आहे. राजस्थानातील श्री गंगानगर येथे देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे. येथे डिझेलचा भाव ९९.८० रुपये आहे.
अमेरिकेच्या इंधन साठ्यात वाढ झाल्याने तेलाचे दर कमी झाले. बुधवारच्या सत्रामध्ये डबल्यूटीआय क्रूड ०.१ टक्क्याच्या किरकोळ घसरणीसह ७० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. ब्रेंट क्रूडचा भाव ७२.२९ डॉलर प्रती बॅरल आहे. अमेरिकेच्या गॅस कंपन्यांच्या साठ्यामध्ये झालेल्या वाढीनंतर तसंच अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांकडून मागणी वाढल्यानंतर आणि अमेरिकेतील ऑईल इनव्हेंटरीजमध्ये घसरणीनंतरही कच्च्या तेलाचे दर कमी झालेले पाहायला मिळाले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
अमेरिकेच्या साठ्यामध्ये गेल्या आठवड्यात ५.२ दशलक्ष बॅरलची घट ढाल्यानं तेलाच्या किमतींची घसरण मर्यादीत होती. गेल्या आठवड्यातील घसरण ही सलग ११ व्या आठवड्याची घसरण ठरली. ३.३ दशलक्ष बॅरलची घट होण्याचा अंदाज ओलांडत हा आकडा वाढला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी तेहराणवरील बंदी उठवण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेत इराणचे कच्चे तेल परत येण्याची शक्यता मंदावली आहे त्यामुळं कच्च्या तेलामुळं होणारं नुकसान वाढलं आहे.
पेट्रोल डिझेलचे ११ जून २०२१ चे प्रमुख शहरातील दर
शहर | पेट्रोल | डिझेल |
मुंबई | १०२.०४ | ९४.१५ |
दिल्ली | ९५.८५ | ८६.७५ |
चेन्नई | ९७.११ | ९१.४२ |
कोलकाता | ९५.८० | ८९.६० |
पुणे | १०१.६४ | ९२.३२ |
बंगळुरु | ९९.०५ | ९१.९७ |