◆>>महाराष्ट्राला केंद्राकडून आठवड्यात ७.५ लाख डोस; यूपी, गुजरातला ७८ लाख डोस !
Type Here to Get Search Results !

◆>>महाराष्ट्राला केंद्राकडून आठवड्यात ७.५ लाख डोस; यूपी, गुजरातला ७८ लाख डोस !

 


🗣️ महाराष्ट्राला केंद्राकडून आठवड्यात ७.५ लाख डोस; यूपी, गुजरातला ७८ लाख डोस !


 💢केंद्र सरकारने राज्याला एका आठवड्यासाठी साडे सात लाख लसींचा पुरवठा केला आहे. तर, इतर राज्यांच्या तुलनेनं महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा केला आहे,' असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसंच, लशीच्या पुरवठ्याच्या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. 


'👉 राज्याला एका आठवड्यासाठी केंद्रानं फक्त साडे सात लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. ही आकडेवारीचा तक्ता आल्यानंतर मी तातडीने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही ही दुरुस्ती होण्याची वाट पाहात आहोत,' असं टोपे यांनी म्हटलं आहे.


 'राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊनही मिळणाऱ्या लसींचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४. ५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख असून अशा परिस्थितीत आम्हाला फक्त साडे सात लाख लशीचे डोस का?, असा सवाल राजेश टोपे यांनी केंद्राला केला आहे. राज्यात आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच, राज्यातील लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु राहिलं,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.


 💥गुजरातमध्ये ६ कोटी लोकसंख्या आहे, आपली लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यांच्याकडे आत्तापर्यंत १ कोटी डोस दिले, आपल्याला १ कोटी ४ लाख डोस दिले. गुजरातमध्ये १७ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आपल्याकडे ४.५ लाख आहेत. मृतांचा आकडा देखील आपल्याकडे खूप जास्त आहे. जिथे जास्त गरज आहे, तिथे अधिक लक्ष द्यावं ही मागणी आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section