◆>> ठळक बातम्या आणि दिनविशेष ०८.०४.२०२१
Type Here to Get Search Results !

◆>> ठळक बातम्या आणि दिनविशेष ०८.०४.२०२१

 


◆>> ठळक बातम्या आणि दिनविशेष ०८.०४.२०२१
✒️ अँटिलिया प्रकरण : "मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, हे सगळं खोटं आहे", अनिल परब यांचे स्पष्टीकरण

✒️ दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार, वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिक्षण विभाग निर्णय घेणार

✒️ सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, मात्र नियम पाळण्यात सहकार्य हवे; लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती, म्हणून सर्व जनतेला आधीच सावध करत होतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

✒️  महाराष्ट्रात 5,01,559 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 26,13,627 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 56,652 रुग्णांचा मृत्यू

✒️ फोर्ब्ज: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी चिनी उद्योगपती जॅक मा यांना मागे टाकून बनले आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

✒️ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाणला वरिष्ठांकडून 1-2 नाही तर तब्बल 27 कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या; वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक छळ

✒️ भारतात 9,05,021 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,18,48,905 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,66,892 रुग्णांचा मृत्यू

✒️ प्रवासी मजुरांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची भीती, मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी; सरकारने ट्रेनची संख्या वाढवली, लोक हजारोंच्या संख्येने गावाकडे निघणार

✒️ "एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसला", केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

✒️ धार्मिक भावना दुखावण्याचं स्वातंत्र्य अभिव्यक्तीच्या अधिकारात नाही; एका खटल्यादरम्यान हायकोर्टाचा निर्णय

📅 *दिनविशेष*

🔰 *जन्म:* 🔰

🔖 *1924*: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म. 

🔰 *मृत्यू:* 🔰

🔖 *1857*: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू. 

🔖 *1894*: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन.

🔖 *1974*: मराठी रंगभूमीवरील कलाकार नानासाहेब फाटक यांचे निधन.

🔰 *घटना:*🔰

🔖 *1838*: द ग्रेट वेस्टर्न हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

🔖 *1911*: डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.

🔖 *1921*: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.

🔖 *1929*: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.

🔖 *1950*: भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.

🔖 *1993*: मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात सामील झाले.

🔖 *2005*: पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.

▪️▪️▪️▪️▪️▪️
👬 हि माहिती मित्रांना पण शेअर करा.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section