◆● भारताची_वाटचाल_निष्क्रिय_भविष्याकडे - एक जबरदस्त लेख.
Type Here to Get Search Results !

◆● भारताची_वाटचाल_निष्क्रिय_भविष्याकडे - एक जबरदस्त लेख.

 ◆● भारताची_वाटचाल_निष्क्रिय_भविष्याकडे


       आज बालवाडीपासुनच फुकटचा भात अंडे शिरा देउन बालमनापासुनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण 100 यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट कर्जमाफी ह्या गोष्टीची आशा लावुन  सध्याच्या सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.


 देशात सध्या जवळपास 67% लोकसंख्या तरुणांची आहे, हेच प्रमाण महाराष्ट्रातही आहे. ज्या वयात आपले भविष्य  घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना 600 रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी अशाने  त्याची विधायक  क्रयशक्ती  संपून जाणार आहे. यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या 10 वर्षापासून  इ. 1ली ते 9वी पर्यंत परिक्षाच नाहीये. त्यामुळे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूप कठिन असणार आहे.


ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक बहुतांश ठिकाणी महागड़े mobile, bike तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार मोदी कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फ़ोटो कोणत्या पोज़मध्ये टाकायचा याच चर्चेत असते.


आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला उपलब्ध होते. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता  फुकट रेशन  याने एक आख्खी कर्तृत्ववान  पिढी बर्बाद होणार आहे.


आजच्या तरुणाकडे आशिष्ठः द्रढिष्ठाः बलिष्ठाः हि सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.


सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा राहणार कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे 5-6 टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते. स्विझजरलैंडमध्ये 3-4 वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती.


तेव्हा 77% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला.             आपल्याला स्विट्जरलैंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.


आपल्याला जर खरच स्वतःला आणि देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेल. सरकारने ही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.


मी स्वत: शेतकरीच आहे, अन्न खाण्यासाठी पैसे नाहीत, किमान आपण राहत असलेल्या घराचे 100 units चे बिल भरण्याचे पैसे नाहीत अशी अवस्था अपवाद सोडता कुठेही नाही.      

मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात पात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो व यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे ’रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार  दुराचार, बलात्कार, व्यभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातुन नुकसानच जास्त होते. 🙏

पवन करिअर अकॅडमी, अंबड.

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section