नांदेड प्रकरण...- वाचा नेमकं काय ???
Type Here to Get Search Results !

नांदेड प्रकरण...- वाचा नेमकं काय ???

 


नांदेड प्रकरण...


हल्ली बरेचदा टोकाचे पाऊल उचलताना दिसते. जिथे स्वतः प्रति संवेदना उरलेल्या नाही, तिथे इतरांप्रति कशा असाव्या... नांदेड च्या हल्ल्याचे नेमके कारण काय? कशासाठी?, कारणीभूत कोण? यात मी पडणार नाही पण जे झाले ते योग्य होते का??

         प्रशासनात कोण असते? आणि प्रशासन कोणासाठी असते?

या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकच,"आपण "... प्रशासनात आपल्यापैकीच कोणीतरी असते आणि प्रशासन देखील आपल्यासाठी असते. आई आपल्याला इथे जाऊ नको, हे करू नको, तसे बरोबर नाही हे का म्हणून सांगते? कारण तिला आपल्या लेकराची काळजी असते. मग प्रत्येक वेळी प्रतिकार केलाच पाहिजे का? पोलिसांची चुकी काय होती? वरिष्ठा कडून दिलेल्या सूचनांचे पालन पोलीस करतात मग जनतेला दिलेल्या सूचनांचे पालन जनतेने करायला हवे की नको? निर्बंध सगळ्यांनाच आहे मग सगळेच प्रतिकार करतात का? प्रत्येक धर्माला आपापल्या परंपरा, रूढी प्रिय असतात. आणि आपल्या देशात तर प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला जातो. प्रत्येक उत्सव तेवढ्याच उस्फुर्त पणे साजरे केले जातात. कोण्या विशिष्ट धर्मालाच निर्बंध लागू केलेले नाहीत. मग असे असताना पोलिसावर हल्ला का होतो??

            परिस्थिती काय होती, आणि त्या वेळेला काय झाले हे मला देखील माहिती नाही पण एवढं कळत की परिस्थिती कितीही बिकट असली तरी पोलिसांवर हल्ला योग्य नाही. बरेच वेळा गोष्टी आक्रोशाने न मिटता शांततेत सुटल्या जातात. वेळप्रसंगी आक्रोश असावा कोण नाही म्हणतंय पण एवढा विदारक की कोणाच्या वार केल्याने त्या पोलिसाचे फुफ्फुस दिसत होते. पैसा, भौतिक वस्तुची कितीही हानी झाली तर परत मिळते, पण जीवित हानी न भरून निघणारी कळ आहे. त्यामुळे कोणाच्या जीवावर बेतेल असे प्रसंग नको. हल्ली संपर्क बंद झालाय पण संवेदना आहे तशाच आहेत. संवेदना संपल्या की कोणतेच नाते महत्वाचे वाटत नाही. आपण समधर्मीय नसलो तरी समप्रांतीय तर आहोत. आणि मला वाटते एवढे नाते पुरेसे आहे. तेव्हा आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्याचा उपयोग करा. चुकत असल्यास प्रतिकार कराच पण त्याचे मार्ग जरा बदला. कारण आपलं मुलं नसलं म्हणून काय झाले कोणाच तरी मुलं बाप घरी येईल म्हणून वाट बघत असणार असतय...

           " गव्हा सोबत सोंडे सुद्धा भरडले जाते" हे म्हण इथे लागू होते. एका व्यक्तीच्या वागण्याने समाजकंटक हा शब्द अनेकांसाठी वापरला जातो म्हणून आता आपणच समजलं पाहिजे...अहिंसा पाळत आपल्या मागण्या , तक्रारी पोहचवता आल्या पाहिजेत. कोविडने सगळ्यांना बांधून ठेवलंय तेव्हा धर्माला मोकळे सोडून देत माणुसकीला जपुया ना...


शेवटी, " रक्त आणि अंत हा सगळ्यांचा सारखाच".तेव्हा माणुसकी जोडुया, कारण  आक्रोश तुमचा असो की माझा ,तो विकोपालाच जाणारा असतो आणि त्याचा फायदा खूप कमी वेळा होतो...


प्रत्यक्ष संपर्क सुटलाय संवेदना नाही...

https://t.me/pawanacademyambad

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section